सातारा तिसऱ्या टप्प्यात; सोमवारपासून सर्व दुकाने खुली होणार

बैठका, निवडणूका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व सहकारी संस्थांच्या सभांना ५० टक्केच्या क्षमतेत परवानगी दिली आहे.
सातारा तिसऱ्या टप्प्यात; सोमवारपासून सर्व दुकाने खुली होणार
All shops in Satara will be open from Monday

सातारा : कोरोना संसर्गाचा वेग कमी होऊन जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या सोमवारपासून अत्यावश्यक सेवा तसेच इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. हॉटेल, रेस्टॉरंटना सकाळी सात ते दुपारी चार यावेळेत ५० टक्के क्षमतेच्या आधारे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच आठवड्यातील सर्व दिवस सकाळी सात ते रात्री आठपर्यंत घरपोच पार्सल सुविधा ही देता येणार आहे. सायंकाळी पाच ते दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे.  All shops in Satara will be open from Monday

जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार 17 मे पासून कडक लॉकडाउन लागू केले होते. यामध्ये संसर्गाचा वेग कमी अधिक होत असल्याने मध्यंतरीच्या काळात लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली होती. पण बाधितांचा आकडा वाढू लागल्याने वेळेच्या मर्यादेत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली होती.

पण सततच्या लॉकडाउनला व्यापारी, व्यावसायिकांसह नागरीकांचा विरोध होऊ लागल्याने वेळेच्या बंधनात म्हणजे सकाळी नऊ ते दुपारी दोन यावेळेत अत्यावश्यक सेवेत समाविष्ट दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली होती. पण व्यावसायिकांना दिवसभर दुकाने उघडी हवी असून लॉकडाउनमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. पण संसर्ग वाढण्याची भिती असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी वेळेच्या बंधनातील  लॉकडाउन अनिश्चित कालावधीसाठी चालु ठेवले होते.

मागील आठवड्यात विविध सण असल्याने गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसांनंतर पुन्हा लॉकडाउन शिथिल करण्याचे आदेश आज काढले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवेसह इतर सर्व दुकाने सकाळी नऊ ते दुपारी चार यावेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच हॉटेल, रेस्टारंटस्‌ना सकाळी सात ते दुपारी चार यावेळेत ५० टक्के क्षमतेच्या आधारे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच आठवड्यातील सर्व दिवस सकाळी सात ते रात्री आठपर्यंत घरपोच पार्सल सुविधा ही देता येणार आहे. 

तसेच लॉजिंग व बोर्डिंगची व्यवस्था सकाळी सात ते चार यावेळेत ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. खासगी कार्यालये ५० टक्केच्या मर्यादेत सुररू ठेवता येणार आहेत. शासकिय व निमशासकिय कार्यालयेही वेळेच्या मर्यादेत सुरू राहणार आहेत.  २० पेक्षा जास्त नातेवाईकांना अंत्यविधीसाठी उपस्थित राहता येणार नाही. बैठका, निवडणूका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व सहकारी संस्थांच्या सभांना ५० टक्केच्या क्षमतेत परवानगी दिली आहे. सर्व प्रकारच्या बांधकामांना दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. शेती विषयक सर्व कामांना दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी असणार आहे. 

हे बंद राहणार... 
शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 
मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे 
सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक प्रार्थना स्थळे, करमणूक कार्यक्रम मेळावे
व्यायामशाळा, वेलनेस सेंटर, स्पा 

हे सुरू राहणार....
लॉजिंग, बोर्डिंग
सहकारी व खासगी बँका
रिक्षा, टॅक्‍सी अत्यावश्‍यक सेवेसाठी 
केस कर्तनालये, सौंदर्य केंद्रे
सार्वजनिक परिवहन सेवा शंभर टक्के क्षमतेने 
खासगी वाहतूक, माल वाहतूक

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in