पतीला निलंबित केल्याने पत्नीने घातला सीईओंच्या दालनात गोंधळ...

संबंधित महिलेला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन तुमची काय तक्रार आहे ते त्यांच्याकडे द्या, असे सांगितले.तरीही ती महिला दालनाबाहेर बराच वेळ थांबली होती.
After suspending her husband, his wife caused a commotion in the CEO's office -ub73
After suspending her husband, his wife caused a commotion in the CEO's office -ub73

सातारा : पतीला निलंबित केल्याने संतप्त झालेल्या पत्नीने काल जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या दालनात गोंधळ घातला. जिल्हा परिषद सदस्य व नागरिकांच्या आलेल्या तक्रारीवरुन प्रशासनाने एका औषध निर्माण अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी या अधिकाऱ्याच्या पत्नीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ घातला. त्यामुळे काही काळतणावाचे वातावरण निर्माण झाले होते. After suspending her husband, his wife caused a commotion in the CEO's office 

निलंबित केलेला हा अधिकारी कोरेगाव तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी म्हणून काम करत होता. कर्मचाऱ्यांबाबत जिल्हा परिषद सदस्य व नागरिकांच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे आल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाने औषध निर्माण अधिकाऱ्याला निलंबित केले होते. त्याचा जाब विचारण्यासाठी अधिकाऱ्याच्या पत्नीने जिल्हा परिषदेत धाव घेतली.

महिलेने मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या दालनात गोंधळ घातला. विविध प्रश्नांची सरबत्ती करत तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या महिलेस शांत राहण्याची सूचना जिल्हा परिषद सदस्या अर्चना देशमुख, सुरक्षा रक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी केली. मात्र, ती महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. सीईओंच्या सुरक्षा रक्षकाने सातारा शहर पोलिस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ झेडपीत महिला पोलिस कर्मचारी दाखल झाल्या.

संबंधित महिलेला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन तुमची काय तक्रार आहे ते त्यांच्याकडे द्या, असे सांगितले. तरीही ती महिला दालनाबाहेर बराच वेळ थांबली होती. शेवटी अन्य कर्मचाऱ्यांनी महिलेची समजूत काढत आरोग्य विभागात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ती महिला आरोग्य विभागात गेली. या सर्व प्रकारामुळे जिल्हा परिषदेमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com