कृष्णा कारखान्यासाठी 91 टक्के मतदान; गुरूवारी निकाल 

मतमोजणी केंद्रावर मोबाईल नेण्यास मनाई आहे, त्यामुळे कोणीही मोबाईल आणू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी आष्टेकर यांनी केले आहे.
91 per cent votes were cast for Krishna factory; Counting on Thursday
91 per cent votes were cast for Krishna factory; Counting on Thursday

कऱ्हाड : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शांततेत अन् उत्साहात सरासरी 91 टक्के मतदान झाले आहे. सभासदांच्या मतांचा कौल आज पेटीबंद झाला. गुरूवारी (ता. एक जुलै) मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे कृष्णा कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार याची कराड तालुक्यात उत्सुकता लागली आहे. 91 per cent votes were cast for Krishna factory; Counting on Thursday

कृष्णा कारखान्यासाठी सरासरी तब्बल 91 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी दिली. श्री. माळी म्हणाले, कारखान्याच्या 47 हजार 145 मतदारांपैकी दहा हजार मतदार मृत आहेत. त्यामुळे उर्वरीत 37 हजार 145 मतदारापैंकी तब्बल 34 हजार 532 मतदारांनी त्यांचा हक्क बजावला आहे.

आज सकाळी आठ ते पाच यावेळेत 148 मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. सकाळ पासूनच मतदारांचा उत्साह होता. सकाळी दहापर्यंत सुमारे 21 टक्के, दुपारी 12 पर्यंत 45, दुपारी दोनपर्यंत 60, दुपारी चारपर्यंत 71 तर व सायंकाळी पाच वाजेपर्यंत पर्यंत सुमारे 73 टक्के मतदान झाले. कृष्णा कारखान्याच्या 47 हजार 145 मतदारांपैकी दहा हजार मतदार मृत आहेत. मृत मतदारांचा यादीत समावेश असल्याने मतदानाची टक्केवारी कमी दिसत असली तरी प्रत्यक्षात जे हयात मतदार आहेत.

त्यांना विचारात घेतल्यास मतदानाची आकडेवारी 91 टक्के आहे. कृष्णा कारखान्याचे तीन हजार 613 मतदारांनी मतदान केले नाही. मतदानासाठी कृष्णाच्या निवडणुकीसाठी सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार 500 कर्मचारी नियुक्त केले होते. निवडणूक निरिक्षक रामचंद्र शिंदे, निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी, संजयकुमार सुद्रिक व जनार्दन शिंदे यांचे लक्ष होते.

त्यांनी अनेक मतदान केंद्रांना भेटी दिल्या. चोख पोलिस बंदोबस्तामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठिक ठिकाणी भेटी देऊन आढावा घेतला. कोविडच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने निवडणुक यंत्रणेसमोर आव्हान होते. मात्र तरिही मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली आहे. 

कृष्णा कारखान्याची मतमोजणी गुरूवारी (ता. एक जुलै) कराडातील वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरवात होईल. मतमोजणी केंद्रावर मोबाईल नेण्यास मनाई आहे, त्यामुळे कोणीही मोबाईल आणू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी आष्टेकर यांनी केले आहे. मतमोजणी करताना मतपत्रिका एकत्रित करणार आहोत. त्यानंतर केंद्रनिहाय मतमोजणी होईल, असेही श्री.आष्टेकर यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com