सोलापूर मनपात सर्वपक्षीय नगरसेवकांनी उचलली आयुक्तांची खुर्ची  - Solapur Municipal Corporators took away Commissioner's Chair | Politics Marathi News - Sarkarnama

सोलापूर मनपात सर्वपक्षीय नगरसेवकांनी उचलली आयुक्तांची खुर्ची 

विश्वभूषण लिमये
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

महापालिकेत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेत आज सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.   या अगोदरची ही सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली होती. त्यामुळं सर्वपक्षीय नगरसेवकांची ही सर्वसाधारण सभा वेळेवर पार पडेल अशी अपेक्षा होती. मात्र, मनपा आयुक्त पी. शिवशंकर हे वेळेवर हजार झाले नाहीत.

सोलापूर : सभा तहकूब करण्यात आली होती. त्यामुळं सर्वपक्षीय नगरसेवकांची ही सर्वसाधारण सभा वेळेवर पार पडेल अशी अपेक्षा होती.  मात्र सोलापूर महापालिकेतील सर्वसाधारण सभेमध्ये मनपा आयुक्त पी. शिवशंकर हे वेळेवर हजार झाले नाहीत,  त्यामुळं सर्वसाधारण सभा सुरु होऊ शकली नाही. त्याच्या निषेधार्थ सोलापूर महापालिकेतील काँग्रेस,राष्ट्रवादी,वंचित,शिवसेना,एम आय एम,कम्युनिस्ट अशा सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्तांची खुर्ची उचलून थेट महापौरांच्या केबिनमध्ये नेऊन ठेवली.

महापालिकेत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेत आज सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.   या अगोदरची ही सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली होती. त्यामुळं सर्वपक्षीय नगरसेवकांची ही सर्वसाधारण सभा वेळेवर पार पडेल अशी अपेक्षा होती. मात्र, मनपा आयुक्त पी. शिवशंकर हे वेळेवर हजार झाले नाहीत.

वेळेचे भान नसणाऱ्या अधिकाऱ्यांना महापौरांनी पाठीशी घालू  नये, अशी मागणी ही महापौरांकडे या सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. या वेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांच्या केबिनमध्ये बसून अकार्यक्षम आयुक्तांच्या विरुद्ध नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान सर्व राजकीय नाट्य आटोपल्यानंतर सोलापूर मनपा सर्वसाधारण सभा सुरळीतरीत्या पार पाडण्यात आली.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख