अरुण लाड अडीच कोटींचे धनी; संग्राम देशमुखांकडे ५९ कोटी रुपयांची मालमत्ता - Property of Arun Lad and Sangram Deshmukh described in Election Affidavit | Politics Marathi News - Sarkarnama

अरुण लाड अडीच कोटींचे धनी; संग्राम देशमुखांकडे ५९ कोटी रुपयांची मालमत्ता

उत्तम कुटे
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्याकडे ५८ कोटी ५८ लाख रुपयांची प्रॉपर्टी आहे. राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्याक़डे दोन कोटी ५८लाख रुपयांचे धनी आहेत. दोन्ही उमेदवांराविरुद्ध एकही गुन्हा नोंद नाही.

पिंपरी : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्याकडे ५८ कोटी ५८ लाख रुपयांची प्रॉपर्टी आहे. राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्याक़डे दोन कोटी ५८लाख रुपयांचे धनी आहेत. दोन्ही उमेदवांराविरुद्ध एकही गुन्हा नोंद नाही. दोघांकडेही साखर कारखान्यांचे समभाग तथा शेअर्स आहेत. फक्त फरक एवढाच की एकाकडे खासगी,तर दुसऱ्याचे ते सहकारी कारखान्याचे आहेत.

निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार लाड हे कृषी (बीएसस्सी,अॅग्रीकल्चर),तर देशमुख हे कला शाखेचे पदवीधर (बीए)आहेत.दोघांचेही उत्पन्नाचे साधन शेती आहे.लाड यांच्याकडे क्रांतीअग्रणी डॉ.डी.जी.बापू लाड आणि राजाराम बापू या दोन सहकारी साखर कारखान्याचे शेअर्स आहेत. देशमुख यांच्याकडे ग्रीन पॉवर शुगर लि.चे आठ कोटी नऊ लाख, तर पत्नी अपर्णा यांच्याकडे तीन कोटी ४३ लाखाचे शेअर्स आहेत.

तसेच केन अॅग्रो एनर्जी इं.लि. चे देशमुख यांच्याकडे एक कोटी ३४ लाखाचे युनीट आहेत.देशमुख यांच्या मालकीची एक मोटार व ट्रक आहे.सौ.  देशमुख यांच्याकडे एक ट्रॅक्टर आणि एक मोटारआहे. तर, लाड यांच्याकडे वाहन म्हणून जीप आहे. दोघांच्याही मोबाईलचे शेवटचे पाच आकडे एकच (सारखे) आहेत. दोघांची स्थावर मालमत्ताच (शेत व बिगरशेत जमीन) अधिक आहे. अरुण लाड यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नीकडे जंगम मालमत्ता मात्र जास्त आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख