पंतप्रधानांचा आता थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद, दोन गटांत केली विभागणी

देशात कोरोनाचा सर्वाधिक परिणाम असलेल्या महाराष्ट्राचा समावेश पहिल्या गटात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. २० मे रोजी पंतप्रधान दुसऱ्या टप्प्यांत दहा राज्यातील ५४ जिल्हाधिकाऱ्यांनी बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून जिल्हा पातळीवरील परिस्थितीची माहिती घेतील.
Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली  : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी 'ग्राउंड झिरो' वर लढणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट संवाद साधणार आहेत. येत्या १८ आणि २० मे रोजी दोन गटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हर्च्युअल चर्चा करतील. सुमारे शंभर जिल्हाधिकारी यात सहभागी होणार आहेत.

एप्रिलमध्ये दुसरी लाट आल्यानंतर पंतप्रधानांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संवाद साधला होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील आरोग्य यंत्रणा मोडकळीस आली. दररोज बाधितांची संख्या साडेतीन लाखांच्या आसपास राहिली तर मृतांचा आकडा हा चार हजारांवर गेला. सरकारी आकडे काहीही सांगत असले तरी भोपाळ, लखनौ, पाटणा, कानपूर आदी ठिकाणच्या स्मशानभूमीचे दाहक दृश्‍य, कब्रस्तानांमधील परिस्थिती हे पाहता देशातील कोरोनाचे भेसूर रूप दिसून आले. गेल्या तीन दिवसांपासून तर अंत्यसंस्कारही होऊ न शकलेली शेकडो मृतदेह उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगेवर तरंगू लागली आणि सरकारी व्यवस्थेचे आणखी धिंडवडे निघाले. 

पंतप्रधानांनी याआधी ऑक्सिजन आणि लसींच्या संकटावर मात करण्याच्या दृष्टीने विविध अभ्यास गटांबरोबर चर्चा केली होती. मात्र संसर्गाशी प्रत्यक्ष लढणारे देशातील जिल्हाधिकारीच असतात. त्या दृष्टीने आता पंतप्रधान जिल्हाधिकाऱ्यांशी दोन गटांत संवाद करणार आहेत. यावेळी संबंधित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित असतील. १८ मे रोजी सकाळी ११ पासून होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ९ राज्यातील ४६ जिल्हाधिकारी बैठकीत सहभागी होतील. 

देशात कोरोनाचा सर्वाधिक परिणाम असलेल्या महाराष्ट्राचा समावेश पहिल्या गटात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. २० मे रोजी पंतप्रधान दुसऱ्या टप्प्यांत दहा राज्यातील ५४ जिल्हाधिकाऱ्यांनी बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून जिल्हा पातळीवरील परिस्थितीची माहिती घेतील.

कोरोना मृत्यूदर
१.९ टक्के.

सक्रिय रुग्ण संख्येतील वाढ
१६ टक्के.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com