बिहारमध्ये महागठबंधन विजयी होईल : पृथ्वीराज चव्हाण

मोदी सरकारला केवळ निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यांना लोकांशी, शेतकऱ्यांशी, अर्थव्यवस्था कोलमडली याच्याशी त्यांना काहीही देणघेण नाही, असे सांगूनश्री. चव्हाण म्हणाले, कोविड सुरु होण्यापुर्वीच भारताच्या अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली होती. नोटाबंदी, जीएसटी आणि कोरोनामुळे केलेले लॉकडाउन याचा परिणाम झाला आहे. कोविडची फार मोठी किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला मोजावी लागली आहे.
Congress Leader Prithviraj Chavan
Congress Leader Prithviraj Chavan

कऱ्हाड : बिहारमध्ये भाजपबद्दल प्रचंड नाराजी असून नितीशकुमार यांच्याबद्दल अंतर्गत नाराजी आहे. भाजपने मित्रपक्ष रामविलास पासवान यांना नितीशकुमार यांना विरोध करायला सांगितले आहे. त्यामुळे भाजपची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे वातारवण तयार केले आहे. लालुप्रसाद यादव यांना बरेच दिवस तुरुगांत ठेवल्याने त्यांच्याबद्दल सहानुभुती आहे. नव्या पिढीचे युवक बाहेर निघाले असल्याने बिहारमध्ये महागठबंधन विजयी होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

आमदार चव्हाण म्हणाले, बिहारची निवडणुक सुरु आहे. भाजपने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात बिहारमध्ये फुकट कोरोनाची लस देऊ असे जाहीर केले. मी त्या वक्तव्याचा निषेध करतो. बिहारपुरते असे केंद्र सरकारला करता येणार नाही. केवळ राजकारणासाठी, मते मिळवण्यासाठी लस देणे निषेधार्य आहे. त्याची निवडणुक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांना सर्वच राज्यांना लस द्यावी लागेल. कोरोनाच्या महामारीचे त्यांनी राजकारण करु नये, असे आमचे म्हणणे आहे.

मोदी सरकारला केवळ निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यांना लोकांशी, शेतकऱ्यांशी, अर्थव्यवस्था कोलमडली याच्याशी त्यांना काहीही देणघेण नाही, असे सांगून श्री. चव्हाण म्हणाले, कोविड सुरु होण्यापुर्वीच भारताच्या अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली होती. नोटाबंदी, जीएसटी आणि कोरोनामुळे केलेले लॉकडाउन याचा परिणाम झाला आहे. कोविडची फार मोठी किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला मोजावी लागली आहे. 2020-21 च्या आर्थिक वर्षातील पहिल्या तीमाहित भारताच्या अर्थव्यवस्थेचे उत्पन्न 24 टक्क्यांनी घटले आहे. देशाच्या 200 वर्षांच्या इतिहासात असे कधीच झाले नाही. 

जगात देशाची अर्थव्यवस्था अधिक केविलवानी झाली आहे. जगात भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाचवा क्रमांक आहे. मात्र, ती वेगाने घसरत आहे. त्याचा परिणाम रोजगारावर, दैनंदिन जीवनावर होणार आहे. केंद्र सरकाराने गेल्या महिन्यात तीन कृषी सुधारणा विधेयक मंजुर केले. शेतकऱ्यांच्या 250 अधिकृत संघटना आहेत, मित्रपक्षाचे मंत्री यांच्याशी चर्चा न करता आवाजी मतदानाने राज्यसभेत बहुमत नसताना कायदा पास केला. त्याला काँग्रेस कडाकडुन विरोध केला आहे.

पंजाबने स्वतंत्र अधिवेशन बोलवुन स्वतःचा वेगळा कायदा केला. शेती हा विषय राज्य सरकारच्या अधिकारात असताना शेतीबद्दल कायदे करायचा अधिकारी केंद्राला नाही.म्हणुन आमचे आंदोलन सुरु आहे. ते अधिक तीव्र होईल. बांग्लादेशची ज्या भारताने निर्मिती केली, तेथे उपासमार होत होती, त्या देशाचे दरडोई उत्पन्न भारताच्या पुढे गेले आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था चिंतेची बनली आहे.

चीनचा प्रश्न चर्चेतून सुटणे कठीण....

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, चीनबरोबरचा भारताचा संघर्ष सुरु आहे, त्यात सकारात्मक चिन्हे दिसत नाहीत. चीन ऐकायला तयार नाही. याबाबत केंद्र सरकार अधिकृतपणे काहीच माहिती सांगत नाही. मात्र, काही निवृ्त्त सैन्य अधिकारी, काही चॅनेलकडुन चीनने दोन चार महिन्यात 1200 चौरस किलोमीटरचा प्रदेश व्यापला आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वाटाघाटी करुन हा प्रश्न सोडवला पाहिजे. मात्र, आपण वेगळ्या मार्गाने गेलो, त्यामुळे चर्चेतुन मार्ग सुटेल असे दिसत नाही.

चीन मागे हटायला तयार नाही. भारतापेक्षा चीनची अर्थव्यवस्था मोठी आहे. त्यामुळे कोविडच्या दरम्यान अचानक लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेत संकट आले आहे. त्यातच शेती कायद्यात बदल केल्यामुळे काही संकट येणार आहे. केंद्र सरकारने जीएसटी गोळा करावा, त्या गोळा झालेल्या करापैकी काही वाटा राज्य सरकारला मिळेल असे सांगितले. त्यामुळे राज्यांनी संमती दर्शवली. मात्र, राज्याचा जीएसटीचा कर देण्यास केंद्राने कोविडचे कारण सांगुन नकार दिला.

त्यानंतर दहा राज्यांनी उठाव केल्यामुळे केंद्राने आत्ता देतो असे सांगितले आहे. त्याला चार महिन्यांचा वेळ घालवला. राज्य सरकारची कोविडमुळे बिकट स्थिती आहे. शरद पवार यांनी वाट्टेल तेवढे कर्ज काढा, असे सांगितले मात्र, राज्याला तसे कर्ज काढता येत नाही. त्यामुळे कोविड कमी झाला तरी आर्थिक संकट संपलेले नाही.  

खडसेंना माझ्या शुभेच्छा...

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी माजी मुख्यमंत्र्यावर रोष दाखवला आहे. त्यांना चांगली वागणुक मिळाली नाही. त्यांच्याबद्दल छळवाद झाला, असा आरोप केला आहे. त्यांनी पक्षांतर केले आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे सांगुन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळुन भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करु, असा विश्वास व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com