साखर घोटाळ्यात इम्रान खानच्या मित्राचाही समावेश, अद्याप कुणालाही अटक नाही.. - imran khans friend involved in sugar scam not arrested yet anyone | Politics Marathi News - Sarkarnama

साखर घोटाळ्यात इम्रान खानच्या मित्राचाही समावेश, अद्याप कुणालाही अटक नाही..

पीटीआय
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

साखर तपास आयोगाने गेल्या मे महिन्यात साखर घोटाळा उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानातील साखर सम्राटांनी उत्‍पादन, विक्री, खरेदी आणि निर्यात करताना १५० बिलियन रुपयांचा घोटाळा केल्याचे आरोपात म्हटले आहे. पाकिस्तानातील जवळपास ८८ साखर कारखान्यांच्या मालकांनी साखर सल्लागार समितीसह अन्य शासकीय संस्थेतील अधिकारी आणि सदस्यांची संगनमत करीत हा घोटाळा केल्याचा आरोप तपास संस्थेने ठेवला आहे. 

लाहोर : कोट्यवधी रुपयांच्या साखर घोटाळाप्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू आणि विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. सोबतच पंतप्रधान इम्रान खान यांचे जवळचे मित्र जहॉगीर तरीन यांचाही यात समावेश आहे. या प्रकरणात तपास संस्थेने मोठमोठ्या हस्तींच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. पण अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. 
 
पाकिस्तानची सर्वोच्च तपास संस्था ‘एफआए’ ने पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) शाहबाज शरीफ, त्यांचे पुत्र हमजा आणि सुलेमान यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय जहॉंगीर तरीन आणि त्यांचे पुत्र अली तरीन या सर्वांच्या विरोधात पैशाची हेरफेर, सार्वजनीक समभागांची लूट, यांसह अन्य कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शरीफ कुटुंबीयांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तरीन पितापुत्रांनी ४.३३ बिलियन तर शरीफ यांनी २५ बिलियन रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप तपास संस्थेने ठेवला आहे.
 
विशेष म्हणजे ‘सिक्युरिटी ॲण्ड एक्सेंज कमिशन ऑफ पाकिस्तान’ आणि ‘एफआयए’ ने एकत्रितपणे तरीन आणि शाहबाज शरीफ यांच्याविरोधात दाखल केलेली तक्रार लाहोर उच्च न्यायालयाने खारीज केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नव्याने तक्रार दाखल करण्यात आली आहे. शाहबाज आणि त्यांचे पुत्र हमजा हे सध्या लाहोर येथील कोट लजपत तुरुंगात न्यायिक कोठडीत आहेत. धाकटा पुत्र सुलेमान सध्या इंग्लंडमध्ये असून त्याला पाकिस्तान सरकारने फरारी घोषित केले आहे. त्याच्यावरही पैशाची फेराफेरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तरीन हे ‘पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी असलेल्या ‘मुल्तान सुलतान या संघाचे मालक असून ते नुकतेच इंग्लंडमधून भारतात परतले आहेत. 

साखर तपास आयोगाने गेल्या मे महिन्यात साखर घोटाळा उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानातील साखर सम्राटांनी उत्‍पादन, विक्री, खरेदी आणि निर्यात करताना १५० बिलियन रुपयांचा घोटाळा केल्याचे आरोपात म्हटले आहे. पाकिस्तानातील जवळपास ८८ साखर कारखान्यांच्या मालकांनी साखर सल्लागार समितीसह अन्य शासकीय संस्थेतील अधिकारी आणि सदस्यांची संगनमत करीत हा घोटाळा केल्याचा आरोप तपास संस्थेने ठेवला आहे. 

अद्याप एकालाही अटक नाही 
पाकिस्तानच्या सर्वात शक्तिशाली तपास संस्थेने साखर घोटाळा प्रकरणात अनेक बड्या हस्तींविरोधात तक्रारी दाखल केल्या असल्या तरी अद्याप अटक कुणालाही केली नाही. शाहबाज पूर्वीच एका प्रकरणात तुरुंगात आहेत. तरीन हे पाकिस्तानात असले तरी त्यांच्याविरोधातही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.

(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख