This will not expose the abusive alliance of leaders-police-mafia Says Congress Leader Prithviraj Chavan | Sarkarnama

यामुळे नेते-पोलिस-माफीयांच्या युतीचा पर्दाफाश होऊ शकणार नाही : पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 12 जुलै 2020

कैद्यांच्या हातात बेड्या न घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे पोलिस एन्काऊंटरला प्रोत्साहन मिळत आहे. त्याचा फेरविचार होणे आवश्‍यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

सातारा : विकास दुबे एन्कांऊटरमुळे राजकीय नेते-पोलिस-माफीया यांच्यातील अभद्र युतीचा आता पर्दाफाश होऊ शकणार नाही. कैद्यांच्या हातात बेड्या न घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांमुळे पोलिस एन्काऊंटरला प्रोत्साहन मिळते. त्याचा फेरविचार होणे आवश्‍यक आहे, असे मत कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्टिटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. 

उत्तर प्रदेशातील कुख्यात डॉन विकास दुबे याचा शुक्रवारी कानपूर शिवेवर एन्काऊंटर झाला. एक राज्यमंत्र्यांची पोलिस ठाण्यातच गोळ्या झाडून हत्या करणारा आणि बिकरू गावात डीएसपीसह आठ पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणातील तो मुख्य आरोपी होता. 

हेही वाचा ः ईडीने मागवली विकास दुबेच्या संपत्तीची माहिती...

दुबेच्या एन्काऊंटरनंतर सोशल मिडियासह विविध पक्षातील नेत्यांनी उलट सुटल प्रतिक्रिया दिल्या. यासंदर्भात कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज आपल्या व्टिटर अकौंटवरून याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. 

आवश्य वाचा ः जलसंपदाच्या प्रकल्पांसाठी कर्जाची आवश्यकता नाही : जयंत पाटील

श्री. चव्हाण म्हणतात, विकास दुबे एन्काऊंटरमुळे राजकिय नेते-पोलिस-माफीया यांच्यातील अभद्र युतीचा पर्दाफाश होऊ शकणार नाही. कैद्यांच्या हातात बेड्या न घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे पोलिस एन्काऊंटरला प्रोत्साहन मिळत आहे. त्याचा फेरविचार होणे आवश्‍यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख