Udayanraje to bring big railway project in Satara | Sarkarnama

उदयनराजे आणणार साताऱ्यात रेल्वेचा मोठा प्रोजेक्ट 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 2 जुलै 2020

कोरोनाचा उद्रेक झाल्यास काय करणार अशी भिती व्यक्त करून उदयनराजे म्हणाले, कोरोना रोकण्यासाठी देशातील संशोधक व शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे औषधोपचार करायला हवेत. त्यासाठी मी पंतप्रधानांना ही ईमेलव्दारे कळविले आहे.

सातारा : साताऱ्यात रेल्वेचा मोठा प्रोजेक्‍ट आणण्याचा आपला मानस असून संपूर्ण जिल्ह्याला नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे. रेल्वेच्या बोगी बनविण्याचा प्रकल्प असणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शासनाची उपलब्ध असलेल्या जागेचा वापर केला जाणार आहे. हा प्रकल्पाचा आराखडा आम्ही केंद्राकडे सादर केला आहे, अशी माहिती साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे
भोसले यांनी दिली.

कऱ्हाड चिपळूण रेल्वे मार्गासह व सातारा-पुणे डबल ट्रॅकचे काम भूसंपादनात रखडले आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी येत्या आठ जुलैला पुण्यात बैठक होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सातारा पालिकेशी संबंधित काही प्रश्‍न, औद्योगिक वसाहत, रेल्वे आणि कोरोनाच्या प्रश्‍नासंदर्भात आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी त्याच्यासमवेत सुनील काटकर, दत्तात्रेय बनकर, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

 कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना जिल्हा प्रशासन सर्व काही अटोक्‍यात आणू शकणार नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. कोरोनाचा उद्रेक झाल्यास काय करणार अशी भिती व्यक्त करून उदयनराजे म्हणाले, कोरोना रोकण्यासाठी देशातील संशोधक व शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे औषधोपचार करायला हवेत. त्यासाठी मी पंतप्रधानांना ही ईमेलव्दारे कळविले आहे.

साताऱ्यातील विविध प्रश्‍नांचे मुद्दे मुख्यमंत्र्यांपुढे ही मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुरेश प्रभु रेल्वेमंत्री असताना कऱ्हाड चिपळूण रेल्वे मार्ग आणि सातारा- पुणे डबल ट्रॅकच्या कामाची आम्ही मागणी केली होती. पण हे काम भूसंपादनात अडकल्याने रखडले आहे. यासंदर्भात येत्या आठ जुलैला पुण्यात बैठक होणार आहे. त्यामध्ये सर्व मार्ग निघेल, असेही त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात रेल्वेचाएक मोठा प्रोजेक्‍ट आणण्याचा माझा मानस असल्याचे सांगून उदयनराजे म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यालाच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे. साताऱ्यात रेल्वेच्या बोगी बनविण्याचा प्रकल्प आहे. यासाठी जिल्ह्यातील शासनाच्या उपलब्ध जागेचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा आम्ही केंद्राकडे सादर केला आहे. लवकरच त्याबाबतचा निर्णय होईल,  असेही त्यांनी सांगितले. 

मंत्र्यांच्या दौऱ्याची कल्पनाच दिली जात नाही...

उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांपूर्वी साताऱ्याच्या दौऱ्यावर आले होते. तुम्ही त्यांना का भेटला नाही, असे विचारले असता उदयनराजे म्हणाले, याची मला कोणी कल्पना दिली नव्हती. लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत कळवायला हवे होते. माझ्या ऑफिसला त्यांच्या दौऱ्याचे पत्र यायला हवे होते. त्यांना वाटते आम्हालच दौरे पडतात. त्यामुळे आम्हाला कोणी दौरे कळवत नाही. मुळात अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख