वादग्रस्त ढाच्यातील दोन विटा शिवसेना शाखेच्या पायाभरणीत....

सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी निर्णय दिल्यावर राज ठाकरे बोलले होते, की आज बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते. खरंच अगदी तीच भावना आज सर्वांची आहे. राज ठाकरे हे सुद्धा सुरवातीपासून जाहीर सभेत व अनेक ठिकाणी हेच बोलत आले होते. राममंदिर व्हायलाच हवे.
Manse Leader Bala Nandgaonkar
Manse Leader Bala Nandgaonkar

मुंबई : आयोध्येतील विवादित ढाचा जमीनदोस्त करून तेथून निघतांना ज्या विटा तिथे राम मंदिरासाठी जमा झाल्या होत्या. त्यातील दोन विटा आठवण म्हणून आम्ही सोबत आणल्या होत्या. काही काळाने माझंगाव कोर्टाच्या बाजूला शिवसेनेच्या नवीन कार्यालयाच्या पायाभरणीच्या वेळी त्या दोन विटा आम्ही तेथे ठेवल्या. आता तिथे सध्या शिवसेनेची शाखा आहे, अशी माहिती मनसेचे प्रवक्ता बाळ नांदगावकर यांनी दिली आहे.

दरम्यान, राम जन्मभूमीशी आमचे थेट "रक्ताचे" नाते असल्याने या भूमिपूजनाचे महत्त्व मला औरच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राममंदीराच्या भुमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून आज जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. श्री. नांदगावकर म्हणतात, अयोध्येत उद्या (बुधवार) राममंदिराचे भुमिपूजन होत आहे. करोडो लोकांचे अनेक पिढ्यांचे स्वप्न प्रत्यक्षात येत आहे. परंतु हा दिवस येण्यामागे लाखो लोकांचा संघर्ष आहे. मला अतिशय गर्वाने नमूद करावेसे वाटते की त्यात माझा ही खारीचा वाटा आहे.

मुंबई महापालिकेचा नगरसेवक असतांना 1992 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही त्यावेळचे सहकारी नगरसेवक सुभाष कांता पाटील, दिगंबर कादंरकर, जयवंत परब, के. पी. नाईक, श्रीकांत सरमळकर, विलास अवचट, विश्वनाथ नेरुरकर, अनंत भोसले असे सर्वजण आम्ही कारसेवक म्हणून सामील झालो होतो. प्रथम फैसाबाद येथे गेलो व तिथून बसने अयोध्याकडे मार्गस्थ झालो. तेथे अतिशय तंग वातावरण होते.

कोणत्याही क्षणी कुठूनही हल्ला होण्याची, पोलिसांचा गोळीबार होऊन जीव जाण्याची शक्यता होती. परंतु अतिशय स्फूर्तिदायक वातावरण असल्याने मरणाची भिती आम्हाला कुठेही जाणवली नाही. तसेच थेट विवादित ढाचा पाडण्यात जे अग्रेसर होते. त्यापैकी एक असण्याचे भाग्य मला लाभले. त्यामुळे राम मंदिराचे महत्त्व आमच्यासाठी काय आहे, हे शब्दात सांगणे कठीण आहे.

विवादित ढाचा जमीनदोस्त करून तेथून निघतांना ज्या विटा तिथे राम मंदिर बांधण्यासाठी जमा झाल्या होत्या. त्यातील दोन विटा आठवण म्हणून मी सोबत घेऊन निघालो. काही काळाने माझंगाव कोर्टाच्या बाजूला शिवसेनेच्या नवीन कार्यालयाच्या
पायाभरणीच्या वेळी आम्ही त्या दोन विटा तेथे ठेवल्या. आता तिथे शिवसेनेची शाखा आहे. हे सर्व मांडण्याचे कारण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.

राम जन्मभूमीशी आमचे थेट "रक्ताचे" नाते असल्याने या भुमिपूजनाचे महत्त्व काही औरच आहे.  सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी निर्णय दिल्यावर राज ठाकरे बोलले होते, की आज बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते. खरंच अगदी तीच भावना आज सर्वांची आहे. राज ठाकरे हे सुद्धा सुरवातीपासून जाहीर सभेत व अनेक ठिकाणी हेच बोलत आले होते. राममंदिर व्हायलाच हवे. युतीच्या अगदी सुरवातीच्या काळात एक घोषणा घरोघरी पोहचली होती की, "गर्व से कहो हम हिंदू है" पण आज हा एक अध्याय पूर्ण होत असताना व याची देही याची डोळा राममंदिर आपण सर्व जण लवकरच पाहणार आहोत. 

सर्व धर्माचा व धर्मियांचा सन्मान आपण कायमच राखतो व राखूच, परंतु हे करतांना आपल्या "हिंदू" धर्माचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. उगाच  धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आपल्याच धर्माची खिल्ली उडविणे, हे अतिशय घृणास्पद असेच आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच एवढे मोठे पुण्य काम कारसेवक म्हणून आम्हाला करता आले. त्याबद्दल त्यांचा मी कायमच ऋणी राहिन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com