मोदी सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय देतय : पृथ्वीराज चव्हाण

लॉकडाऊनबाबत मोदी सरकारमध्ये सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तु सुरु होणार आहेत की नाही याबाबत स्पष्टता नाही. लोकांच्या रोजीरोटीवर काय परिणाम होतोय याचा विचार केंद्र सरकारकडून होत नाही. देशात सहमतीचे राजकारण होताना दिसत नाही.
Prithviraj Chavan In Andolan
Prithviraj Chavan In Andolan

कऱ्हाड : अर्थव्यवस्थेला शेतकरी राजा वाचवु शकेल. देशात फक्त कृषी अर्थव्यवस्था स्वबळावर शेतकऱ्यांनी सुरु ठेवली आहे. त्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार करत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गडगडले असतानाही त्याचा फायदा नागरीकांना देण्याऐवजी पंतप्रधान मोदी सरकराने अर्थव्यवस्थेतील तुट भरुन काढण्यासाठी डिझेल-पेट्रोलची दरवाढ केली आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

पेट्रोल, डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे, कोण म्हणतोय देत नाय, घेतल्याशिवाय राहात नाय., बिचारी जनता करे पुकार, मोदी सरकार हाय, हाय.. अशा घोषणांनी आज कऱ्हाडच्या प्रशासकीय इमारतीचा परिसर दणाणून गेला. काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तेथून बैलगाडीतून प्रशासकीय इमारतीसमोर जाऊन आंदोलन केले.

आंदोलनानंतर पत्रकाऱांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, केंद्र सरकाराने 820 टक्क्यांनी डिझेलवर वाढ केली आहे, असे सांगूण ते म्हणाले, डिझेल-पेट्रोलचे दर वाढवल्याने सहा वर्षात पंतप्रधान मोदी सरकारने कर वाढवुन 18 लाख कोटी रुपये मिळवले आहेत. डिझेलची दरवाढ केल्याने दैनंदिन गरजेच्या वस्तुंची दरवाढ झाली आहे. तेलाचे दर कमी करुन सामान्यांना दिलासा देणे आवश्यक होते.

मात्र, त्यांनी भाववाढ करुन आर्थिक तुट भरुन काढण्याचे काम सुरु केले आहे. लॉकडाऊनबाबत मोदी सरकारमध्ये सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तु सुरु होणार आहेत की नाही याबाबत स्पष्टता नाही. लोकांच्या रोजीरोटीवर काय परिणाम होतोय याचा विचार केंद्र सरकारकडून होत नाही. देशात सहमतीचे राजकारण होताना दिसत नाही. भारत-चीन सिमवेर सध्या वाद सुरु आहे. पंतप्रधान मोदी हे चीन सैन्य भारतीय हद्दीत घुसले नाहीत असे सांगत आहेत, मग सैनिक शहीद कसे झाले ? याचे उत्तर त्यांनी देण्याची गरज आहे.

संसदेचे अधिवेशन बोलवुन, विरोधी पक्षाबरोबर सहमती करुन त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. मात्र पंतप्रधान मोदी चर्चेला जायला तयार नाहीत. त्यामुळे देशात एकाधिकारशाहीचे काम सुरु आहे. लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार विरोधी पक्षाचा आहे. सरहद्दीवर जावुन चीनचे नाव घ्यायला पंतप्रधान घाबरत आहेत. त्यांच्या एकाही भाषणात त्यांनी चीनचे नाव घेत नाहीत. बोटचेपी धोरण ते का घेत आहेत याबद्दल ते बोलायला तयार नाहीत. केंद्र सरकाराने राज्य सरकारला कायद्याप्रमाणे जीएसटीचा, वित्त आयोगाचा वाटा तातडीने दिला पाहिजे. तरच राज्य नागरीकांचे उत्तरदायीत्व पुर्ण करु शकेल. 


लाल किल्यावर भाषणासाठीच खटाटोप...

जगात कोठेही कोरोनावर लस उपलब्ध नाही. देशातील संशोधकांनी लसीची चाचणी महिन्याभरात करण्याची कार्यवाही सुरु करणार असल्याचे म्हंटले आहे. त्यासाठी अजुनही बराच कालावधी लागणार आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टपासून रुग्णांना लस टोण्यास प्रारंभ करणार असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. त्यांना लाल किल्यावरुन भाषण करुन चीनने व्हायरस जगाला दिला आणि त्याचे उत्तर आम्ही शोधले हे त्यांना सांगायचे आहे, हे सांगण्यासाठी खटाटोप सुरु आहे, असाही आरोप श्री. चव्हाण यांनी केला. 

100 युनीट मोफत वीजेची मागणी ...

वीजेची मागील तीन महिन्यांची वीज बिलांचे रिडींग घेता आलेले नाही. बिले सरासरी करुन देण्यात आली आहेत. मध्यंतरी वीज नियामक आयोगाने वीजेची दरवाढ केली होती. त्या सर्वांचा विचार करुन मुख्यमंत्री, उर्जामंत्र्यांशी चर्चा करुन त्यावर काही सुट देता येईल का, यावर विचार सुरु आहे, असे सांगून पृथ्वीराज चव्हाण यांनी आमची तर 100 युनीट वीज मोफत द्यावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com