खासदार उदयनराजेंनी यासाठी केले योगी आदित्यनाथांचे भरभरून कौतूक

उत्तरप्रदेशात संग्रहालयाच्या रुपाने राष्ट्रीय स्मारक उभारल्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. उत्तर प्रदेशातील या संग्रहालयासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वस्तू, शस्त्र, दस्तऐवजाच्या प्रतिकृती घराण्याच्यावतीने आम्ही देऊ असे उदयनराजेंनी योगी आदित्यनाथ यांना सांगितले.
MP Udayan Raje praised Yogi Adityanath for this
MP Udayan Raje praised Yogi Adityanath for this

सातारा : महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून शिवसेनेसह अनेक राजकिय पक्षांनी आपले राजकिय अस्तित्व निर्माण केले. त्याच शिवसेनेला महाराजांच्या किर्तीला साजेसं असं स्मारक महाराष्ट्रात उभारता आलं नाही, अशी खंत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. मात्र, उत्तरप्रदेशात संग्रहालयाच्या रुपाने राष्ट्रीय स्मारक उभारल्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. या संग्रहालयासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वस्तू, शस्त्र, दस्तऐवजाच्या प्रतिकृती घराण्याच्यावतीने आम्ही देऊ असा शब्द उदयनराजेंनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला.
 
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच केली. त्यांच्या या निर्णयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज या नात्याने खासदार उदयनराजे भोसले यांनी राजमुद्रा भेट देऊन योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. 

योगी आदित्यनाथ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानचे राष्ट्रपुरूष आहेत. त्यांच्या शौर्याला आणि पराक्रमाला संपूर्ण जगात तोड नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. त्यामुळे मुघली गुलामी मानसिकतेच्या प्रतिकाला या उत्तरप्रदेशात स्थान नाही. म्हणूनच आम्ही आग्रा येथील संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले आहे. या संग्रहालयाच्या माध्यमातून मांडला जाणारा मराठा साम्राजाचा इतिहास केवळ राष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी असेल. 

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मुघल म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाच
महिन्यांपूर्वी केली. त्यांच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुकही केले. या म्युझियमच्या निर्माणासाठी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांची
आग्र्याहून सुटका या घटनेचा इतिहास शोधण्यासाठी पुरावे जमा करण्यात आले आहेत.

जानेवारी २०१६ मध्ये या संग्रहालयाचे भूमिपूजन झाले असून ताजमहालच्या गेटपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर हे संग्रहालय उभं राहणार आहे. सुमारे २०० कोटी रूपये खर्चाच्या या म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगजेबाने आग्रा येथे कैदेत ठेवले होते. पण शिवाजी महाराजांनी यशस्वीपणे आग्राहून सुटका केली. याचा प्रेरणादायी या संग्रहालयात मांडला जाणार आहे. 

यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा नित्सिम भक्त असून त्यांच्या स्वराज्यातून आजही आम्हाला मोठी प्रेरणा मिळत आहे. त्यांच्यासारख्या राष्ट्रपुरूषांचा इतिहास जगापुढे आणला पाहिजे. महाराजांचा गनिमी कावा साऱ्या जगाने गौरविलेला आहे. आजही अनेक देशात या तंत्रांचा वापर केला जातो. ही अभिमानाची बाब असल्याचे योगी यांनी सांगितले.

उदयनराजे म्हणाले, आतापर्यंत अनेक राजकिय पक्षांनी आणि नेत्यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला. मात्र तुमच्या सारख्या राजकिय नेत्यांनी पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांच्या नावे संग्रहालय बनवून महाराजांच्या पराक्रमाचा मोठा गौरव केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास संपूर्ण जगापुढे आणण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे. त्याबद्दल आम्ही आमच्या घराण्याच्या वतीने तुमचे आभार मानतो.

महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून शिवसेनेसह अनेक राजकिय पक्षानी आपलं राजकिय अस्तित्व निर्माण केलं. त्याच शिवसेनेला महाराजांच्या किर्तीला साजेसं असं स्मारक महाराष्ट्रात उभारता आलं नाही, अशी खंत उदयनराजेंनी व्यक्त केली. उत्तरप्रदेशात संग्रहालयाच्या रुपाने राष्ट्रीय स्मारक उभारल्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. उत्तर प्रदेशातील या संग्रहालयासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वस्तू, शस्त्र, दस्तऐवजाच्या प्रतिकृती घराण्याच्यावतीने आम्ही देऊ असे उदयनराजेंनी योगी आदित्यनाथ यांना सांगितले. 

प्रतापगडाला येण्याचे निमंत्रण....
योगी आदित्यनाथ यांना सातारा आणि प्रतापगडाला भेट देण्याचे खास निमंत्रण उदयनराजेंनी दिले. आपण याआधी एकदाच सातारा येथे आल्याची आठवण सांगून लवकरच प्रतापगडाला भेट देण्याचे आश्वासन दिले. गडावरील भवानी मातेची पूजा करून अफझल खानाला याच मातीत गाडल्याचा इतिहास प्रत्यक्ष जाणून घेण्याचे आश्वासन योगी यांनी दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com