काश्मीरची कली बनली कऱ्हाडची सून... - Kashmir's bud became the daughter-in-law of Karad ... | Politics Marathi News - Sarkarnama

काश्मीरची कली बनली कऱ्हाडची सून...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 21 डिसेंबर 2020

अजित पाटील मार्च 2020 मध्ये सुमन यांच्या नातेवाईकांसोबत दहा दिवसांच्या सुट्टीवर जम्मू काश्मीरला गेले होते. कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन झाला अन् तब्बल तीन महिने सुमनदेवीच्या घरी अजित पाटील यांना रहावे लागले. त्याच तीन महिन्यात अजित आणि सुमन यांचे नाते घट्ट झाले. सुमनदेवी यांच्या कुटुंबीयांना अजित यांना जवळून समजून घेता आले. सर्वांच्या संमतीने दोघांची लग्नगाठ पक्की झाली. 

कऱ्हाड (जि. सातारा) : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याने कऱ्हाड तालुक्यातील उंडाळे गावचा सुपुत्र व भारतीय लष्करातील जवान अजित पाटील याला काश्मीरचा जावई होण्याचा मान मिळाला आहे. सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या अजित यांनी काश्मीर येथील मुलगी सुमनदेवी हिच्या सोबत विवाह केला. किस्तवाड येथे काश्मिरी पद्धतीने दोघांचा विवाह झाला. त्यानंतर कऱ्हाडात त्यांचा महाराष्ट्रीयन पद्धतीने विवाह झाला. 

कऱ्हाडला काश्मिरी नातेवाईकांच्या उपस्थितीत सप्तपदी पार आली.  कऱ्हाडचा पुत्र आणि काश्मीर की, कली यांच्या विवाहाची अनोखी कहाणी आहे. त्यांच्या विवाहात कलम 370 चा मोठा अडथळा होता. मात्र, ते कलम हटल्याने लग्न सोहळा पार पडला. 27 नोव्हेंबर 2020 रोजी काही मोजक्या कऱ्हाडातील नातेवाईकांच्या उपस्थितीत अजित व सुमनदेवी यांचा विवाह जम्मू काश्मिरात पार पडला.

अजित प्रल्हाद पाटील हे कऱ्हाड तालुक्यातील उंडाळे गावचे सुपूत्र. अजित सैन्य दलात असून तेथे ते सैनिकी शिक्षणाचे प्रशिक्षण देतात. सध्या ते झाशीत स्थायिक आहेत. त्याच ठिकाणी राहणाऱ्या काश्मीरच्या सहकाऱ्याकडे पाहुणी म्हणून आलेल्या जम्मू कश्मीरमधील किस्तवाड जिल्ह्यातील जोधानगर पलमार येथील सुमनदेवी भगतशी त्यांची भेट झाली. पुढे अजित पाटील मार्च 2020 मध्ये सुमन यांच्या नातेवाईकासोबत दहा दिवसांच्या सुट्टीवर जम्मू काश्मीरला गेले होते. 

कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन झाला अन् तब्बल तीन महिने सुमनदेवीच्या घरी अजित पाटील यांना रहावे लागले. त्याच तीन महिन्यात अजित आणि सुमन यांचे नाते घट्ट झाले. सुमनदेवी यांच्या कुटुंबीयांना अजित यांना जवळून समजून घेता आले. सर्वांच्या संमतीने दोघांची लग्नगाठ पक्की झाली. केंद्र सरकारने जर 370 कलम हटवले नसते, तर आम्ही लग्न करु शकलो नसतो.

370 कलम हटवल्याचा सर्वात जास्त फायदा मला झाला. माझ्यासाठीच कलम हटवल्याची भावना अजित पाटील यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्राच्या सूनबाई झालेल्या सुमनदेवी भगत बारावीचं शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रातील लोकांसह येथील राहणीमान तिला आवडलं. महाराष्ट्रात मुलींना मिळणाऱ्या स्वातंत्र्याचं तिला मोठं अप्रूप वाटते.

आईलाही अप्रूप.....

मुलगा देशसेवेचं काम करत असून मुलाच्या आनंदातच माझं सुख आहे. त्यामुळे समाज काय म्हणेल याची फिकीर नव्हती. सुमन माझी सून नाही, तर मुलगीच असल्याचे अजितच्या आई रंजना पाटील सांगतात.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख