Corona should be confronted with the facts rather than panicked Says MP Udyanraje Bhosale | Sarkarnama

आज ना उद्या प्रत्येकाला जायचेच आहे, कोरोनाला घाबरू नका : उदयनराजे 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 30 जून 2020

जेवढे मृत्यू विविध आजारांनी, सीमेवर आणि वध्दावस्थेमुळे झालेत. त्यापेक्षा दसपटीने मृत्यू रस्ते अपघातात झालेत. त्यामुळे रिलॅक्‍स रहा. कोरोनाचा इतका बाऊ करू नका. 

सातारा : कोरोनाच कोणीही बाऊ करू नका. आतापर्यंत अनेकांना कोरोना होऊनही गेलेला असेल. जगात तीन अब्ज व्हायरस आहेत. त्यामुळे लोकांनी कोरोनाला घाबरून जाण्यापेक्षा वस्तूस्थितीला सामारे जावे. कोरोना कधी संपणार हे कोणीच सांगू शकणार नाही. आज ना उद्या प्रत्येकाला जायचे आहे. त्यामुळे घाबरू नका, असा सल्ला साताऱ्यातील भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जनतेला दिला आहे.

 खासदार उदयनराजे भोसले यांनी आज जिल्हा बॅंकेत जाऊन बॅंकेचे अध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. यानंतर दोघांनी चर्चा केल्यानंतर परत जाताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

उदयनराजे म्हणाले, कोरोनाचा बाऊ करण्याची गरज नाही. आतापर्यंत अनेकांना कोरोना होऊनही गेलेला असेल. असे अनेक व्हायरस देशात असून साधारण तीन अब्ज व्हायरस जगात आहेत. ऑस्ट्रेलिया का न्यूझीलंडमधील शास्त्रज्ञांनी सांगितले की चिकनमधून आणखी एक व्हायरस येणार आहे. लोकांनी घाबरून जाण्यापेक्षा वस्तूस्थितीला सामोरे जावा.

बंदमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उद्या चोरमोऱ्या वाढणार आहेत. लोक काम करायला इच्छुक आहेत. सर्वांनी काळजी घ्यावी व काम करावे. यावर गॅरंटेड वॅक्‍सिन निघेल असे सांगता येत नाही. पुणे येथील सायरस सिरम इन्स्टिट्युटमध्ये लस निर्माण करण्यासाठी ऑक्‍सफर्डचा मदतीने संशोधन सुरू आहे. जेवढे मृत्यू विविध आजारांनी, सीमेवर आणि वध्दावस्थेमुळे झालेत. त्यापेक्षा दसपटीने मृत्यू रस्ते अपघातात झालेत. त्यामुळे रिलॅक्‍स रहा. कोरोनाचा इतका बाऊ करू नका.

आता लोक काम करायला तयार आहेत. विविध राज्यातून आलेले कामगार होते, ते ही परत येत आहेत. प्रत्येकाला आपली प्रतिकार क्षमता वाढवावी लागणार आहे. गोव्यात मी महिनाभर होतो, तेथील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी माझी भेट झाली. येथून गेलेले कामगार परत येत आहे. कारण त्यांना तिकडे रोजगार नाही. उपासमारीमुळे ते कोरोनात गावी गेले होते. कोरोना कधी संपणार हे कोणीच सांगू शकणार नाही. आज ना उद्या प्रत्येकाला जायचे आहे. घाबरू नका. सॅनिटायझर किती लोकांना पुरविणार देशाची लोकसंख्या लक्षात घेता ते पुरवू शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख