भाजपचे शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम केवळ मतांपूरतेच : जयंत पाटील

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेत सभापतींच्या दालनात खासदारकीची शपथ घेतली. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला होता. तेव्हा काय घडले हे आपल्या सर्वांना माहिती आहे.
NCP State President Jayant Patil
NCP State President Jayant Patil

सातारा : भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यातील मनगुत्ती (जि. बेळगाव) गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविण्यात आला आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत असून भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम हे केवळ मतांपूरतेच असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे, अशी टिका राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जयसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.  

आपल्या भावना व्टिटरच्या माध्यमातून व्यक्त करताना जयंत पाटील यांनी म्हटले की, भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. भारतीय जनता पक्षाचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम फक्त मतांपुरते आहे. हे या घटनेतून पुन्हा एकदा
सिद्ध झाले आहे. 

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेचे सभापतींच्या दालनात खासदारकीची शपथ घेतली. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला होता. तेव्हा काय घडले हे आपल्या सर्वांना माहिती आहे. भाजपच्या मनात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत इतका व्देष का आहे, असा प्रश्नही श्री. पाटील यांनी उपस्थित केला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com