भाजप कार्यकारणीत साताऱ्याला झुकते माप; पण दिग्गजांना डावलले

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत सातारा जिल्ह्याला झुकते माप देऊन तब्बल पाच नेत्यांचा समावेश केला आहे. पण माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे यांचा यामध्ये समावेश झालेला नाही. किमान कार्यसमितीत निमंत्रित सदस्य म्हणून या तिघांना घ्यायला हवे होते.
MLA Shivendraraje Bhosale, MP Ranjitsingh Nimbalkar, MLA Jaykumar Gore
MLA Shivendraraje Bhosale, MP Ranjitsingh Nimbalkar, MLA Jaykumar Gore

कऱ्हाड : भाजपच्या प्रदेश कार्यकारणीच्या झालेल्या निवडीत भाजपने पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याला फोकस केले आहे. जिल्ह्यात तब्बल पाचजणांचा कार्यकारणीत विविध पदांवर सहभागी केले आहे. त्यामुळे पुढच्या राजकीय उलाढालीत भाजपकडून जिल्हा टार्गेट होणार आहे. कऱ्हाड तालुक्यातील पाच पैकी तिघे पदाधिकारी कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आहेत. पण जिल्ह्यातील तीन दिग्गज नेत्यांना डावलल्याने त्यांच्या समर्थकांत नाराजी पसरली आहे. 

खासदार उदयनराजे भोसले, वाईचे मदन भोसले, कऱ्हाड दक्षिणचे डॉ. अतुल भोसले यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांना भाजपच्या कार्यकारणीवर तर सहकार सेलच्या सहसंयोजक पदावर शेखर चरेगांवकर यांची वर्णी लावली आहे. त्यामुळे त्या निवडी अधिक विचार पूर्वक केल्या आहेत.

पाचपैकी तिघे पदाधिकारी कऱ्हाड दक्षिणेतील आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच घेरण्याची खेळी केली आहे. भाजपकडून पाच वर्षापासून वेगवेगळ्या खेळी करत जिल्ह्यातील राष्ट्रवादी व काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यापैकी काही खेळीत भाजप यशस्वी झाले आहे. खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे अशा दिग्गजांना भाजपने गोटात घेऊन जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसला शह दिला.

मात्र, तरिही दोन्ही काँग्रेसचेच वर्चस्व जिल्ह्यावर कायम राहिले आहे. कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातपृथ्वीराज चव्हाण यांना चारीमुंड्या चित करण्यासाठी नगरेसवकांपासून त्यांचे निकटवर्तीय व थिंक टॅक मधील माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यापर्यंत भाजपच्या नेत्यांनी फिल्डींग लावली होती. त्यामध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस अतुल भोसेल यांचेही योगदान आहे.

यशापयश नंतरची गोष्ट असली तरी भाजपकडून आखलेल्या व्यूव्ह रचनेमुळे बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसला विजयासाठी धावपळ करावी लागली, ते नाकारता येणार नाही.  भाजपने संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचा त्यांना फायदा झाला. त्या कालवधीत भाजपने कऱ्हाड पालिकेच्या निवडणुकीत शहराच्या नगराध्यक्षापदालाही गवसणी घातली.

त्यासाठी भाजपने शहराध्यक्ष एकनाथ बागडी, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नेते शेखर चरेगांवकर, प्रदेश सरचिटणीस अतुल भोसले यांची एकत्रित ताकद महत्वाची ठरली. त्यानंतरच्या काळात विधानसभेला गवसणी घालण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण आहे. त्या एकजूटीला भाजप आटापिट्टा करत आहे, त्यात स्थानिक राजकारणामुळे अद्याप यश आलेले नाही.

तालुक्यासह जिल्ह्यात मोट बांधण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी नव्याने झालेल्या कार्यकारणीच्या निवडीत सातारा जिल्ह्याला झुकते माप दिले आहे. निवडी करताना पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याचा व आगामी निवडणुकीतील यशाचीच गोळा बेरीज आहे. वर्षभरात पालिकांचा निवडणुका आहेत. त्या निवडणुका पुन्हा एकदा आपल्याच बाजूने खेचून घेण्यासाठीही पक्षाचा आटापिटा दिसतो

डावललेल्यांचे समर्थक नाराज...

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत सातारा जिल्ह्याला झुकते माप देऊन तब्बल पाच नेत्यांचा समावेश केला आहे. पण माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे यांचा यामध्ये समावेश झालेला नाही. किमान कार्यसमितीत निमंत्रित सदस्य म्हणून या तिघांना घ्यायला हवे होते. तिघेही भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. त्यांचे पक्षातील योगदान लक्षात घेऊन कार्यकारिणीत सहभागी करायला हवे होते. मात्र, भाजपकडे त्यांना डावलल्याची भावना त्यांच्या समर्थकांत निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काय भुमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com