केंद्रात तुमची सत्ता, मग आंदोलन करण्यापेक्षा मोदींकडून ओबीसींना आरक्षण मिळवून द्या..

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यात निवडणूकाच होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका पंकजा मुंडे यांनीच सर्वप्रथम घेतली होती.
minister dhnanjay munde -pankaja Munde news Nanded
minister dhnanjay munde -pankaja Munde news Nanded

नांदेड ः ओबीसींच्या जनगनणेसाठी स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांनी संसदेत लढा दिला होता. तेंव्हा मुंडे साहेब विरोधी पक्षात होते, आता तर तुम्ही  सत्तेत आहात,  मग तुम्ही आंदोलन करण्यापेक्षा ओबीसींना मोदींकडून आरक्षण मिळवून का देत नाही? अशी टिका सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे, प्रितम मुंडे भगिनींवर केली आहे. (Your power at the center, then get reservation from Modi to OBCs instead of agitating.)ओबीसी आरक्षणासाठी आम्ही तुमच्या सोबत असल्याचेही मुंडे म्हणाले.

राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने  धनंजय मुंडे नांदेडमध्ये बोलत होते.  सध्या ओबीसी आरक्षणावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. (Ministe Dhnanjay Munde) विशेषतः भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे ह्यांनी राज्यातील ओबीसीचे नेतृत्व आपल्या हाती घेतल्याची देखील चर्चा आहे. (BJP Leader Pankaja Munde) लोणावळा येथे नुकतीच ओबीसी आरक्षणावर मंथन शिबीर झाले, यात देखील पंकजा मुंडे याच केंद्रस्थानी होत्या.

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यात निवडणूकाच होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका पंकजा मुंडे यांनीच सर्वप्रथम घेतली होती. (Bjp Mp Dr. Pritam Munde) आता राज्यात ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे दोन गट पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

महाविकास आघाडीच्या निष्काळजीपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय, तर केंद्राने ओबोसींचा डाटा दडवून ठेवला तो, दिला नाही, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याचा पलटवार शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस या सत्ताधारी पक्षाकडून केला जातो आहे.

या पार्श्वभूमीवर काल नांदेडमध्ये सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा व खासदार प्रितम मुंडे या आपल्या दोन बहिणींवर टीकास्त्र सोडले. मुंडे म्हणाले, ओबीसी आरक्षणासाठी विरोधी पक्षाकडून आंदोलन सुरू आहे, खरतर सर्वात आधी ओबीसींच्या जनगणनेची मागणी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केंद्राकडे केली होती. संसदेच्या सभागृहात त्यांनीच ओबीसींचा लढा सुरू केला, विशेष म्हणजे तेव्हा ते विरोधी पक्षात होते.

मात्र आज केंद्रात भाजपची बहुमताची सत्ता आहे. तेव्हा पंकजा, प्रितम मुंडे यांनी आंदोलन न करता पंतप्रधान मोदी यांच्याकडून ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून द्यावे. त्या जर असं करणार असतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com