तुम्हाला तालुक्यात काम करू देणार नाही, शिवसेना आमदाराने तहसिलदारास धमकावले..

चौकशी करून योग्य कारवाई करतो असे सांगून देखील ज्या प्रकारची भाषा आमदार बांगर यांनी तहसिलदार खेंगले यांच्याबद्दल वापरली.
Shivsena Mla Santosh Bangar- Tahsildar khengle News Hingoli
Shivsena Mla Santosh Bangar- Tahsildar khengle News Hingoli

हिंगोली ः नगरसेवकाच्या मुलाचा वाळूचा पकडलेला ट्रॅक्टर सोडावा यासाठी कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी तहसिलदार मयुर खेंगले यांना फोनवरून धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. (You will not be allowed to work in the taluka, Shiv Sena MLA Santosh Bangar threatened the tehsildar) या संदर्भात हिंगोली जिल्हा महुसल व तलाठी संघटनेच्या वतीने निवदेन देण्यात आले असून आमदार बांगर यांनी माफी मागावी, तसेच पुन्हा अशा प्रकारे आर्वच्य भाषा वापरून वाळूची वाहने सोडण्यासाठी फोन न करण्याचे आश्वासन द्यावे, अन्यथा उद्यापासून लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कळमनुरी पंचायत समितीच्या मागे मौजे शिवणी येथील ओढ्यावरू अवैध वाळु वाहतुक सुरू असल्याच्या माहितीवरून तहसिलदार खेंगले यांनी काल (ता.१८) रोजी कारवाई केली होती. (Tehsildar Khengale took action on the information that illegal sand transportation was going on) यात नगरसेवकाचा मुलगा रवि शिंदे याचा वाळूचा ट्रॅक्टर एमएच-२०, एल-४४७० जप्त करून कळमनुरी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला होता.

सदर कारवाईची माहिती कळाल्यानंतर शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी तहिसलदार खेंगले यांना फोन करून ट्रॅक्टर जप्त का केला? ताबोडतोब सोडून द्या,नाहीतर कार्यकर्ते घेऊन येईल आणि तहसिल कार्यालय फोडून टाकीन, अशी धमकी दिल्याचे तलाठी संघटनेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

बांगर यांनी तहसिलदारांना आर्वाच्य भाषा वापरून अपमानित तर केलेच पण सरकारी कामात अडथळा देखील निर्माण केला. (Bangar not only insulted the tehsildars by using vulgar language but also obstructed government work.) बांगर यांनी खेंगले यांना वारंवार फोन करून अजून ट्रॅकटर का सोडला नाही? मी तालुक्याचा आमदार असून माझे ऐकत नाही का? मी काहीही करू शकतो, तुम्ही नवीन आहात, तुम्हाला कोणत्याही प्रकरणात अडकवू शकतो.

माफी मागा, अन्यथा लेखणी बंद..

तुम्हाला तालुक्यात काम करू देणार नाही. आता कार्यकर्ते आणून तुमचे कार्यालय फोडून टाकतो. आजच्या आज रेती घाट आणि अवैध वाळूच्या गाड्या बंद झाल्या पाहिजे, नाहीतर तुम्हाला पाहून घेतो, अशी धमकी दिल्याचे देखील या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

चौकशी करून योग्य कारवाई करतो असे सांगून देखील ज्या प्रकारची भाषा आमदार बांगर यांनी तहसिलदार खेंगले यांच्याबद्दल वापरली आहे, ती त्यांच्या प्रतिष्ठेचा अवमान करणारी आहे. याचा परिणाम शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर होऊ शकतो.

झालेला प्रकार दुर्दैवी असून महसुल व तलाठी संघटना याचा निषेध करते. (The incident is unfortunate and the Revenue and Talathi Association opposes it.) झालेल्या प्रकाराबद्दल आमदारांनी माफी मागावी, पुन्हा असा प्रकार घडणार नाही, असे आश्वासन द्यावे, अन्यथा उद्या २० मे पासून जिल्ह्यात लेखणी बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत दिला आहे.

धमकावले नाही, विनंती केली- बांगर

दरम्यान, घडलेल्या प्रकारावर आमदार संतोष बांगर यांच्याकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आले आहे. वाळू वाहतुकीचा परवाना असतांना देखील तहसीलदारांनी ट्रॅक्टर पकडुन पोलीस स्थानकात लावल्याची माहिती कळाली होती. (You were asked to leave only the tractor, said Mla Bangar) त्यामुळे आपण केवळ ट्रॅकटर सोडून द्यावा, अशी विनंती केली होती, असे बांगर यांनी म्हटले आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com