तुम्ही आमची मने जिंकली, आता औरंगाबादेत हाॅकीच्या मैदानासाठी प्रयत्न करणार..

वैयक्तिकरित्या मी खूप आनंदी आहे की, तुम्ही माझ्या शहरात हॉकीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रेरित केले आहे.
Mp Imtiaz Jalil Congratulate Indian Hockey Team News Aurangabad
Mp Imtiaz Jalil Congratulate Indian Hockey Team News Aurangabad

औरंगाबाद ः भारतीय पुरूष हाॅकी संघाने ४१ वर्षानंतर टोकियो आॅलंम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवत देशाचे नाव उंचावले. प्रत्येक भारतीयासाठी हा गर्वाचा क्षण आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह देशातील राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, नेते आणि सर्वसामान्यांकडून भारतील हाॅकी खेळांडूवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (You have won our hearts, now we will try for a hockey field in Aurangabad.) एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय हाॅकी संघाचे अभिनंदन करणारे ट्विट केले आहे.

तुम्ही आमची मने जिंकली आहात, तुमच्याकडून प्रेरणा घेऊन मी माझ्या मतदारसंघातील छावणी परिसरात हाॅकीचे मैदान बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे इम्तियाज यांनी म्हटले आहे. (AIMIM Mp Imtiaz Jalil Aurangabad) औरंगाबाद शहरात विविध क्रिडा प्रकार खेळले जातात. साई, विद्यापीठ, विभागी क्रिडासंकुलाच्या माध्यमातून मैदानी खेळाचे प्रशिक्षण घेण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात. पण अजूनही सर्वसमान्य व गरीब घरातील मुलांना अशा संस्थांमध्ये पोहचणे शक्य होत नाही.

कधी काळी शहरात हाॅकीची देखील मोठी क्रेझ होती. शहरातील आमखास मैदानावर अजूनही फुटबाॅलचे सामने खेळवले जातात. छावणी भागात बऱ्याच वर्षांपुर्वी हाॅकी खेळली जायची. पण कालांतराने हा सगळा परिसर लष्कराच्या ताब्यात गेला आणि हाॅकीचे मैदानही गेले. टोकीयो आॅलंम्पिक स्पर्धेत भारतीय महिला व पुरूष संघांनी दमदार कामगिरी करत देशातील हाॅकीला पुन्हा एकदा संजिवनी दिली आहे.

४१ वर्षानंतर जागतिक स्तरावरील मोठ्या स्पर्धेत मिळालेले कांस्यपदक देशाचा गौरव वाढवणारे ठरले आहे. देश आणि जगभरातून भारतीय हाॅकी खेळांडूवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी देखील भारतीय खेळाडूंना ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

इम्तियाज जलील म्हणतात, तुम्ही सामना गमावला असला तरी आमची ह्दय नक्कीच जिंकले आहे.  तुम्ही आम्हा सर्वांना अभिमानास्पद बनवले आहे. वैयक्तिकरित्या मी खूप आनंदी आहे की, तुम्ही माझ्या शहरात हॉकीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रेरित केले आहे. आम्ही औरंगाबाद छावणीतील हॉकी मैदानासाठी प्रयत्न करू पूर्वी खेळासाठी ओळखले जाणारे हे क्षेत्र होते, याचा इम्तियाज जलील यांनी आवर्जून उल्लेख केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com