हो, तिसरी लाट येणारच; मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हैसेकर यांचे भाकीत.. - Yes, the third wave is coming; Chief Minister's Adviser Mhaisekar's prediction jp75 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

हो, तिसरी लाट येणारच; मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हैसेकर यांचे भाकीत..

अतुल पाटील
रविवार, 8 ऑगस्ट 2021

येणारी तिसरी लाट दुसऱ्या लाटेसारखी भयंकर ठरू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाला स्वत:चा वाटा उचलावा लागणार आहे.

औरंगाबाद : अमेरिकेसह ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले असताना मागील तीन दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. (Yes, the third wave is coming; Chief Minister's Adviser Mhaisekar's prediction) भारतातही कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा आक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणार असल्याचे भाकित मुख्यमंत्र्यांचे सल्लागार तथा ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केले.

लोकसंवाद फाऊंडेशनतर्फे आयोजित ऑनलाईन संवादमालेत डॉ. म्हैसेकर यांनी 'कोविड मुक्तीचा मार्ग' या विषयावर मागदर्शन केले.  डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोविड ही जागतिक महामारी आहे. (Corona Third Wave Coming News) त्यातुन माणसांना वाचण्यासाठी केवळ तीनच पर्याय उपलब्ध आहे. यात प्रत्येकाने लस घेतली पाहिजे, लस घेतल्यानंतरही चेहऱ्यावर मास्क घातले पाहिजे आणि बाहेर पडताना किमान सहा फुटांचे अंतर राखले पाहिजे. त्याशिवाय आपण या कोरोनाला हरवू शकत नाही.

अमेरीकेत अतिशय कमी झालेले रुग्णांचे प्रमाण मागील तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहे. (Chief Minister's Adviser Dr. Dipak Mhaisekar, Maharashtra) त्याठिकाणी ६० टक्के लसीकरण झालेले असतानाही १ लाख २० हजार एकाच दिवशी नवीन कोविड पेशंट निघाले. दुसऱ्या दिवशी ७० हजार रुग्णसंख्या एकाच दिवशी वाढली. हीच परिस्थिती ब्रिटनमध्ये दिसून आली आहे. त्यामुळे भारताला अधिक सजगपणे पावले उचलावी लागणार आहेत. येणारी तिसरी लाट दुसऱ्या लाटेसारखी भयंकर ठरू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाला स्वत:चा वाटा उचलावा लागणार आहे.

त्याशिवाय तिसऱ्या लाटेला थोपवणे शक्य होणार नाही, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. कोरोनाचा अधिसंक्रमण कालावधी २ ते १४ दिवसाचा असू शकतो. मात्र प्रत्यक्षात पाच ते सात दिवसच असतो. यात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या काळात काळजी घेणे अतिशय महत्वाचे असल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. 

तीन ते चार आठवडे महत्वाचे

लस घेतल्यानंतर तुम्हाला तात्काळ त्याचा परिणाम जाणवणार नाही. तुमच्या शरीरात इम्यूनिटी वाढण्यासाठी लस घेतल्यानंतर साधारणत: तीन ते चार आठवड्याचा कालावधी लागतो. हा कालावधी झाल्यानंतर कोविड होण्याची शक्यता कमी राहते. यानंतरही कोविड झाल्यास त्याचा परिणाम निश्चितच कमी जाणवतो. मृत्यूचे प्रमाणही अत्यल्प होऊन जाते. त्यामुळे लस घेणे अतिशय महत्वाचे असल्याचेही डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

हे ही वाचा ः या आधीच्या लोकप्रतिनिधींना व्हिजनच नव्हते, गडकरींच्या खांद्यावरून इम्तियाज यांचा निशाणा..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख