हो मोदींनी देशाचा जीडीपी वाढवला, पटोलेंचा खोचक टोला

राज्यातील कोरोनाच्या आजच्या परिस्थितीला केंद्रातील सरकारच जबाबदार असल्याचा आरोप पटोले यांनी केला.
Assembely Session News Nana Patole- Devendra Fadnvis news
Assembely Session News Nana Patole- Devendra Fadnvis newsSarkarnama

औरंगाबाद ःविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशाचा जीडीपी वाढवल्याचा आकडा चुकीचा सांगितला. खरतर त्यांनी सांगितलेल्या आकड्यापेक्षाही जास्त जीडीपी देशाचा मोदींनी वाढवला आहे. गॅस-डिझेल आणि पेट्रोलच्या रोज वाढत असलेल्या किमंतीतून तो दिसतो आहे, असा खोचक टोला काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

अर्थंसंकल्पीय अधिवेशनातील राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलतांना नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या भाषणातील अनेक मुद्यावर चिमटे काढले. पटोले यांच्या आधी फडणवीस यांनी सभागृहात प्रदीर्घ भाषण केले. त्यानंतर बोलायाला उठलेल्या पटोले यांनी सुरूवातीलाच देशात भडकलेल्या पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमतीवरून भाजपला सुनावले.

पटोले म्हणाले, ज्या उज्वला गॅस योजनेचा गवगवा केंद्र सरकारकडून केला जातो, त्यातील ९० टक्के लाभार्थ्यांना गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे तो रिफील करता आलेला नाही. महागाईमुळे सर्वसामान्याचे जगणे मुश्किल झाले आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याला महाविकास आघाडी सरकार कसे जबाबदार आहे असा आरोप विरोधकांकडून आमच्यावर केला जातो.

पण मुळात मार्चमध्ये जेव्हा कोरोनाचा धोका आपल्या देशात वाढू शकतो हे सांगितले गेले, तेव्हाच जर तातडीने विेदेशातून येणाऱ्या विमानांना बंदी घातली असती तर देशावर आणि राज्यावर एवढे मोठे संकट ओढावले नसते. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या आजच्या परिस्थितीला केंद्रातील सरकारच जबाबदार असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

डेलकर प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करा..

देशाच्या लोकसभेत सातवेळा निवडूण आलेला आदिवासी खासदार मुंबईत येऊन आत्महत्या करतो. त्याने लिहलिलेल्या पंधरा पानी सुसाईड नोटमध्ये त्याला भाजपच्या नेत्यांनी व तिथल्या सरकारी यंत्रणांनी कसा त्रास दिला याचा उल्लेख करतो. यावरून त्यांना किती त्रास झाला असेल याचा अंदाज येतो.

आपल्याला गुजरात किंवा इतर ठिकाणी न्याय मिळणार नाही म्हणून मुंबईत येऊन आत्महत्या करतो, यावरून हे प्रकरण किती गंभीर आहे, याचा अंदाज येतो. सुसाईड नोटमध्ये ज्या भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांची नावे आहेत, त्या सगळ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करा, अशी मागणी देखील नाना पटोले यांनी आपल्या भाषणात केली.

तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या धान्याची खरेदी हमीभावाने सरकारने करावी, तसेच शेतकरी कर्जमाफी योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये देण्याची केलेली घोषणा याची अंमलबजावणी तात्काळ करावी.

याच अधिवेशनात प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा करून ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, अन्यथा शेतकऱ्यांचा विश्वास उडेल आणि जे नियतमित कर्जफेड करतात ते देखील यापुढे कर्जाची रक्कम भरणार नाही, असा इशारा पटोले यांनी दिला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com