शिवसेनेच्या आधी वर्षभरापुर्वीच काॅंग्रेसने स्वबळाची घोषणा केली.. - A year before the Shiv Sena, the Congress declared its independence. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

शिवसेनेच्या आधी वर्षभरापुर्वीच काॅंग्रेसने स्वबळाची घोषणा केली..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 9 जून 2021

देसाई यांनी स्वबळाची घोषणा केली, त्यावर काॅंग्रेसने प्रतिक्रिया देण्याचे काही कारण नाही.

औरंगाबाद ः शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी शिवसैनिकांना संबोधित करतांना काल आगामी सगळ्या निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याचे मला समजले.  पण आमचे संपर्क नेते अमित देशमुख यांनी औरंगाबाद महापाललिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा वर्षभरापुर्वीच केली आहे. (A year before the Shiv Sena, the Congress declared its independence.) एवढेच नाही तर काॅंग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील राज्यात काॅंग्रेस स्वबळावर लढणार हे वर्षभराआधीच जाहीर केले होते. त्यामुळे आमची स्वबळाची घोषणाही शिवसेनेच्या आधीची असल्याचा दावा काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डाॅ. कल्याण काळे यांनी केला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना शाखा स्थापनेच्या वर्धापनदिना निमित्त केलेल्या भाषणात स्वबळावर निवडणूका लढवण्याचे जाहीर केले. (Congress Distrcit president Dr. Kalyan Kale)  जिल्हा परिषद, महापालिकेसह सर्व ठिकाणी फक्त शिवसेनेचा भगवाच फडकला पाहिजे, असे आवाहन देसाई यांनी केले होते. यावरून आता जिल्ह्यात राजकीय चर्चा आणि दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत.

काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांनी शिवसेनेच्या स्वबळावर प्रतिक्रिया देतांना आम्हीच वर्षभरापुर्वी स्वबळाची घोषणा केली, असे स्पष्ट करत आगामी सर्व निवडणुका काॅंग्रेसही स्वबळावरच लढणार असल्याचे नमूद केले. शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे, प्रत्येक पक्षाला निवडणूका लढवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे देसाई यांनी स्वबळाची घोषणा केली, त्यावर काॅंग्रेसने प्रतिक्रिया देण्याचे काही कारण नाही.

सगळ्याच निवडणुका स्वबळावर..

राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकीची चर्चा सुरू होती, (Nana Patole had clarified the role of the Congress.) त्याचवेळी आमचे नेते नाना पटोले यांनी काॅंग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. सर्व निवडणुका काॅंग्रेस स्वतंत्रपणे लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जेव्हा तयारी सुरू झाली तेव्हा देखील जिल्ह्याचे संपर्क नेते राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी औरंगाबादेत येऊन कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्वबळाची घोषणा करत त्यादृष्टीने तयारीला लागा, असा संदेश दिला होता. त्यामुळे शिवसेनेने स्वबळाची घोषणा आज केली असली तरी काॅंग्रेसने ती वर्षभरापुर्वीच केली होती, याचा पुनरुच्चार देखील काळे यांनी केला.

हे ही वाचा ः यंग ब्रिगेडमधील गळती, अन् काॅंग्रसेने उत्तर प्रदेशात गमावला ब्राम्हण चेहरा..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख