राजकीय पुढाऱ्यांमुळेच कोरोनाचा फैलाव होणार नाही का? खंडपीठाने सुनावले

कोरोना सारख्या गंभीर संकटाच्या काळात देखील राजकीय पुढाऱ्यांकडून अशा प्रकारचा निष्काळजीपणाच कोरोनाचा फैलाव होण्यास कारणीभूत ठरू शकतो.
Aurangabad Mumbai bench news
Aurangabad Mumbai bench news

औरंगाबाद ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना देखील अनेक राजकीय पुढाऱ्यांकडून जाहीर कार्यक्रम घेतले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी कोणताही जाहीर कार्यक्रम न घेण्याचे आवाहन केलेले असतांनाही हे कार्यक्रम होत असल्याबद्दल संताप व्यक्त करतांनाच राजकीय पुढाऱ्यांमुळेच कोरोनाचा फैलाव होणार नाही का? (Wouldn't the corona spread because of political leaders? The bench ruled) असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला सुनावले.

औरंगाबादसह राज्याच्या विविध भागात कोरोनाचे निर्बंध असतांना राजकीय पुढाऱ्यांकडून वेगवेळी उद्घाटन केली जात आहेत. काही दिवसांपुर्वी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मतदारसंघातील बजाजनगर भागात पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन केले होते.  (A few days back, Shiv Sena MLA Sanjay Shirsat had inaugurated a water supply scheme in Bajajnagar area of the constituency.) या प्रकरणी खंडपीठाने पोलिसांना शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल केला, कुठली कलमं लावली याची विचारणा करत माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते.

कोरोना सारख्या गंभीर संकटाच्या काळात देखील राजकीय पुढाऱ्यांकडून अशा प्रकारचा निष्काळजीपणाच कोरोनाचा फैलाव होण्यास कारणीभूत ठरू शकतो, असे स्पष्ट करत पोलिस या पुढाऱ्यांवर कारवाई का करत नाही? (Is there a satire of police and political leaders? This question has also been asked by the bench.) पोलिसांचे आणि राजकीय पुढाऱ्यांचे साटेलोटे आहे का? असा सवाल देखील खंडपीठाने केला आहे.

शिवसेनना आमदाराने घेतलेल्या उदघाटनाच्या कार्यक्रमाचा संदर्भ देत खंडपीठाने राज्य सरकार व पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्र्यांनी कोणताही जाहीर कार्यक्रम न घेण्याचं आवाहन केलेलं असतानाही हे कार्यक्रम होतायत ? अशाने या राजकिय पुढाऱ्यांमुळेच कोरोनाचा फैलाव होणार नाही का? असा प्रश्न देखील न्यायालयाने उपस्थित केला.

 या नेते मंडळींवर कारवाईही होत नाही, याचा अर्थ पोलीस आणि राजकारण्यांचं काही साटंलोटं आहे का? (Now we have to issue clear orders) अशी विचारणा करतांनाच न्यायालयाने आता आम्हालाच स्पष्ट आदेश जारी करावे लागतील की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही राजकिय पुढा-यानं कोणताही जाहीर कार्यक्रम करू नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com