महिला पोलीस कर्मचाऱ्याने भाजप आमदाराच्या गाडीला केला दंड ..

गाडी रॉंगसाईड घेऊन जात वाहतुक नियमांचे उल्लंघन केले म्हणून संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने चालकाला दोनशे रुपयांचा दंड आकारत पावती केली. गाडी भाजप आमदारांची आहे असे सांगत चालकाने पावती घेण्यास नकार दिला, पण नियम सगळ्यांना सारखाच असे सांगत चालकाला दंडाची पावती घेण्यास सदर महिला पोलीस कर्मचाऱ्याने भाग पाडले.
police constable fine mlas car news
police constable fine mlas car news

हिंगोली ः गाडी योग्य दिशेने घेऊन जाण्याची सूचना करूनही ती न ऐकता चुकीच्या वळणाने घेऊन जाणे हिंगोलीचे भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या चालकाला चांगलेच महागात पडले. वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी वाहतुक पोलिस शाखेच्या महिला कर्मचाऱ्याने चालकाला दोनशे रुपयांचा दंड ठोठावत कारवाई केली. चालकाने ही गाडी आमदारांची आहे, हे सांगितल्यावरही महिला कर्मचाऱ्याने नियमानूसार पावती करत कारवाई केल्याने त्यांच्या या कृतीचे समर्थन होत आहे. नियम सर्वांसाठी सारखाच अशा प्रतिक्रिया सर्व सामान्यांमधून उमटत आहेत. 

हिंगोली शहरातील गांधीचौकातील चौधरी पेट्रोल पंपाकडे जातांना आमदार मुटकुळे यांची एमएच-३८, व्ही-४४९९ ही अकोला रस्त्याकडून डिझेल भरण्यासाठी चुकीच्या दिशेन जात होती. तेव्हा बंदोबस्तावर असलेल्या शहर वाहतूक महिला पोलिस कर्मचाऱ्याने चालकाला गाडी वळवून घेण्यास सांगितले, मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.

गाडी रॉंगसाईड घेऊन जात वाहतुक नियमांचे उल्लंघन केले म्हणून संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने चालकाला दोनशे रुपयांचा दंड  आकारत पावती केली. गाडी भाजप आमदारांची आहे असे सांगत चालकाने पावती घेण्यास नकार दिला, पण नियम सगळ्यांना सारखाच असे सांगत चालकाला दंडाची पावती घेण्यास सदर महिला पोलीस कर्मचाऱ्याने भाग पाडले.

दरम्यान, आमदार मुटकुळे यांनी ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई झाली तेव्हा आपण गाडीत नव्हतो, पण त्या भागातील सीसीटीव्ही फुटेच तपासून चालकाने जर वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले तर निश्चतच दंड भरला जाईल. चालकाने चुकी केली असेल तर पोलिसांनी केलेला दंड योग्यच असल्याचे म्हटले आहे.

गेल्याच महिन्यात मुटकुळे यांनी शहरात वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात निवेदन देत त्या रोखण्याची मागणी केली होती. पण पोलिसांनी त्यांच्याच वाहनाला दंड लावत नियम सर्वांसाठी सारखाच असल्याचे दाखवून दिले आहे. 

गुजरातमध्ये आरोग्य मंत्र्यांच्या मुलावर एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने कारवाई केल्याचे प्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत असतांना हिंगोलीत झालेल्या कारवाईची देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. महिनाभरापुर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावरून बंदोबस्तवार असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने हिंगोलीच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यावर कारवाई करत गाडी जप्तीची कारवाई केली होती.

खाजगी गाडीवर अंबर दिवा लावून उपजिल्हाधिकारी फिरत होते. परंतु या कारवाईवरून जिल्ह्यात पोलिस विरुध्द महसुल संघटना असा संघर्ष झाला होता. उपजिल्हाधिकाऱ्यांची गाडी रोखणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास निलंबित करण्याची मागणी करत राजपत्रित अधिकारी संघटनेने जिल्ह्यात कामबंद आंदोलनही केले होते.  

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com