नाना पटोलेंच्या आरोपाचा खुलासा ठाकरे, पवार करतील का?..

विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणाऱ्या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा.
नाना पटोलेंच्या आरोपाचा खुलासा ठाकरे, पवार करतील का?..
Bjp Mla Atul Save-Cm Uddhav Thackeray News Aurangabad

औरंगाबाद ःओबीसी समाजाचा विश्वासघात  करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता उद्या १५ सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करणार आहे. (Will Thackeray and Pawar reveal Nana Patole's allegations?)  आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही भाजपकडू करण्यात येत आहे.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस अतुल सावे यांनी आंदोलनाविषयी माहिती दिली. सावे म्हणाले, गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. (Bjp Protest fof Obc Resrvation) ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी सरकारने तातडीने कार्यवाही करायला हवी असे केंद्राने  राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे.

मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. (Bjp Mla Atul Save) या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय ५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे.

सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही.

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकिलच उभा केला नाही असे सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले आहेत. विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणाऱ्या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा, अशी मागणीही सावे यांनी यावेळी केली.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही.ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भाजप उद्या, १५ सप्टेंबर रोजी तालुका पातळीपर्यंत आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in