राज्यसभेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागणार का?
Cogress Leader Pradnya Satav News Hingoli

राज्यसभेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागणार का?

प्रज्ञा सातव यांनी स्वतः पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. राज्यसभेच्या उमेदवारीचा विषय निघाला तेव्हा, त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.

औरंगाबाद ः राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक आयोगाकडून निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यभसेच्या सहा जागा सध्या रिक्त आहेत. त्या जागासाठी ही निवडणुक होणार आहे. महाराष्ट्रातून काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरही निवडणुक होणार आहे. (Will Pragya Satav be cast in Rajya Sabha?)  या जागेवर काॅंग्रेसकडून अनेक इच्छूक असले तरी नुकतीच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झालेल्या राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा यांना संधी मिळणार का? याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

प्रदेश कार्यकारणीत स्थान दिल्यामुळे प्रज्ञा यांना आता राज्यसभेची उमेदवारी मिळणार नाही, असे देखील बोलले जाते. तर दुसरीकडे त्यांना उमेदवारी देण्यासाठीच प्रदेश कार्यकारणीत घेतले गेले,  अशीही चर्चा आहे. (Let Congress Mp Rajiv Satav Maharashtra) आता काॅंग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी व प्रियंका गांधी राज्यसभेवर कुणाची वर्णी लावतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

निवडणुक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त जागांचा कार्यक्रम जाहीर केला यात महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीसह थावरचंद गहलोत (मध्य प्रदेश), मानस भूनिया, (पश्चिम बंगाल), विश्वजीत दायमरी (आसाम), थिरू मनुस्वामी (तमिळनाडू), थिरू वैथिलिंगम (तमिळनाडू), यांनी राजीनामा दिलेल्या जांगाचाही समावेश आहे. (Congress Leader Rahul Gandhi) २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत व  ४ ॲाक्टोबर रोजी प्रत्यक्ष मतदान होऊन त्याच दिवशी मतमोजणीही होणार आहे.

राजीव सातव यांचे काही महिन्यांपुर्वी कोरोनाने अचानक निधन झाले. सातव यांच्या सारखा तरूण आणि काॅंग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता, पदाधिकारी, नेता गेल्याने काॅंग्रेसह सर्वच राजकीय पक्षांना धक्का बसला होता. राहुल गांधी, सोनिया गांधी व प्रियंका गांधी यांनी तर सातव यांच्या निधनानंतर घरातील एक सदस्य गमावलल्याची प्रतिक्रिया देत शोक व्यक्त केला होता. राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठीच्या व्हर्च्युअल सभेत देखील सातव यांच्याबद्दल राहुल, प्रियंका गांधी यांनी संवेदना व्यक्त केल्या होत्या.

सातव यांच्या कुटुंबाच्या पाठीशी संपुर्ण काॅंग्रेस पक्ष व वैयक्तिक गांधी कुटुंब भक्कमपणे उभे असल्याच्या ग्वाही देखील दिली होती. नुकत्याच झालेल्या प्रदेश कार्यकारणीत प्रज्ञा सातव यांना उपाध्यक्ष पद देत राहुल गांधी यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवला. आता सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळते? की मग त्यांना पक्ष कार्याचा अनुभव मिळावा यासाठी वेटिंगवर ठेवले जाते हे लवकरच स्पष्ट होईल.

प्रज्ञा सातव यांनी स्वतः पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. राज्यसभेच्या उमेदवारीचा विषय निघाला तेव्हा, त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. तसेच राजीव सातव यांनी हिंगोली मतदारसंघात केलेली पक्षाची बांधणी, घडवलेले कार्यकर्ते, केलेले काम आणि स्वप्न पुढे न्यायचे असल्याचेही त्यांनी सांगतिले होते.

त्यामुळे प्रज्ञा सातव यांची देखील थांबण्याची तयारी असल्याचे दिसते. प्रदेश उपाध्यक्ष पद दिल्यानंतर काही वर्ष पक्षाचे काम करून मग प्रज्ञा सातव यांना निवडणूकीत उतरवण्याचा विचार राहुल गांधी यांचा असल्याचे देखील बोलले जाते. त्यामुळे राज्यसभेवर तुर्तास काॅंग्रेसमधील इतर नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हिंगोली, कळमनुरीतून संधी?

दिवंगत राजीव सातव यांची राज्यसभेवर निवड होण्यापुर्वी त्यांनी २००९ मध्ये कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून तर २०१४ मध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. कळमनुरी व हिंगोली जिल्ह्यात सातव यांनी काॅंग्रेसचे मोठे जाळे निर्माण केलेले आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर न पाठवता २०२४ मध्ये कळमनुरी विधानसभा किंवा हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते, असे देखील बोलले जाते.

राजीव सातव यांनी या दोन्ही मतदारसंघात केलेले काम, पक्षाला दिलेली बळकटी पाहता प्रज्ञा सातव यापैकी एका मतदारसंघातून विजयी होऊ शकतात, शिवाय राजीव सातव यांच्या सहानुभूतीचा फायदा देखील त्यांना होऊ शकतो, हा विचार देखील पक्षाकडून केला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तुर्तास राज्यसभेच्या जागेवर प्रज्ञा यांच्याऐवजी अन्य कुणाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in