मी सरकारमधील व्यक्ती नसल्याने गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावर बोलणार नाही

केंद्रातील तपास यंत्रणांबद्दल कायम संशयाचे वातावरण राहिलेले आहे. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी देखील या संदर्भात नुकतेच आपले मत मांडले, इतरही लोक मांडत असतात.
Shivsena Leader Sanjay Raut Reaction News Aurangabad
Shivsena Leader Sanjay Raut Reaction News Aurangabad

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल उच्च न्यायालयाचा जो काही निकाल समोर आला आहे, त्याची संपुर्ण माहिती माझ्याकडे नाही. प्रसार माध्यमांमधून जी माहिती समोर येत आहे, त्यावरून किंवा तुम्ही जे सांगताय त्यावरून मत व्यक्त करणे योग्य नाही. राज्य सरकारमध्ये न्यायलायीन आणि कायदा विभाग आहे. स्वतः गृहमंत्री कायदा विभागाचे काम पाहत असतात, त्यामुळे त्यावर सरकारमधील कुणी तरी प्रतिक्रिया व्यक्त करेल. मी सरकारमधील व्यक्ती नसल्याने या विषयावर मत व्यक्त करणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अधिक भाष्य करणे टाळले.

मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर न्यायालयाने संबंधित तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. महाविकास आघाडी सरकारला हा मोठा धक्का समजला जातोय. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये बैठका आणि खलबत सुरू झाली आहेत. राज्याचा नवा गृहमंत्री कोण असेल यावर देखील चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रसार माध्यमांनी बोलते करण्याचा प्रय्तन केला. परंतु राऊत यांनी आज सावधपणे भाष्य केले.

संजय राऊत म्हणाले, उच्च न्यायालयाने राज्याच्या गृहमंत्र्याविषयी जो काही निकाल किंवा निरीक्षणे नमूद केली आहेत. त्यावर सरकारमधील कुणी तरी बोलणे योग्य ठरेल. हा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत गेलाच असेल, त्यामुळे ते स्वतः किंवा त्यांच्या वतीने अन्य कुणी तरी बोलेल. महाविकास आघाडीचे नेते म्हणून शरद पवार हे देखील त्यावर भाष्य करू शकतील. मुळात न्यायालयाचा संपुर्ण निकाल अद्याप हाती आलेला नाही. प्रसार माध्यम आणि तुमच्याकडून जी माहिती मला मिळाली आहे, त्यावर मत मांडणे किंवा न्यायालयाच्या निकालावर बोलणे योग्य नाही. शिवाय मी सरकराचा भाग नसल्यामुळे गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावर मत व्यक्त करणार नाही.

चुकीचा अर्थ लावू नका..

उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे, राज्य सरकारमध्ये कायदा आणि न्याय खाते असते. गृहमंत्री स्वतः कायदा खात्याचा कारभार सांभाळतात. त्यामुळे यावर जी काही प्रतिक्रया किंवा निर्णय घ्यायचा आहे ते सरकार घेईल. मात्र या प्रकरणात काही प्रमाणात राजकारण देखील झाले आहे हे नाकारून चालणार नाही. कुठलीही तपास यंत्रणा अगदी परमेश्वराचा अवतार असणारी देखील आपापल्या पद्धतीने तपास करत असते, निकाल देत असते असा टोला लगावतांनाच राऊत यांनी केंद्रातील तपास यंत्रणावर टीका केली.

केंद्रातील तपास यंत्रणांबद्दल कायम संशयाचे वातावरण राहिलेले आहे. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी देखील या संदर्भात नुकतेच आपले मत मांडले, इतरही लोक मांडत असतात. पण आपल्याकडे एक पंरपंरा आहे. आपण न्यायालयाच्या निकालासमोर मान झुकवतो, त्याचा आदर करतो. त्यामुळे उद्या जेव्हा उच्च न्यायालयाचे निकाल पत्र पुर्णपणे हातात येईल तेव्हाच नेमकं न्यायालायने काय म्हटंल आहे हे स्पष्ट होईल. त्यावर सरकार काय निर्णय घेणार आहे किंवा मत व्यक्त करणार आहे ते ठरेल. त्यामुळे मिडियाने सध्या चुकीचा अर्थ लावून प्रश्न विचारू नये, असेही संजय राऊत म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com