पालकमंत्री सुभाष देसाई औरंगाबादकडे लक्ष देतील का?

राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजचा लाभ देखील अद्याप अनेकांना मिळालेला नाही, अशी ओरड देखील होत आहे.
Guardian Minister Subhash Desai News Aurangabad
Guardian Minister Subhash Desai News Aurangabad

औरंगाबाद ः जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे,  दर सोमवारी होणाऱ्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या बैठकीत आॅक्सिजन, रेमडेसिव्हर, व्हेंटिलेटर आदी विषयांवरून खडाजंगी होत आहे. ( Guardian Minister Subhash Desai Attention to Aurangabad Apposition Demand) परंतु या सर्व परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण देखील पालकमंत्र्यांऐवजी विभागीय आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या महिन्यात सुभाष देसाई यांच्या मातोश्रीचे निधन झाल्यामुळे ते ध्वजारोहणाला हजर राहू शकले नाहीत, असे सांगण्यात आले. परंतु आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्यात येवून एक बैठक घेतली पाहिजे, असा सूर विरोधकांकडून लावला जात आहे.

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहर व जिल्ह्यात पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱ्या लाटेत देखील कोरोनाने चांगलेच डोके वर काढले. ( Corona paitent Increase in Aurangabad) रुग्ण संख्या वाढली तशी मृतांची संख्या देखील चिंता वाढवणारी ठरली. आता काही प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या कमी होतांना दिसत आहे, तर ग्रामीण भागात ती वाढते आहे.

दरम्यान जिल्ह्यात आॅक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिव्हिरचा काळाबाजार, व्हेंटिलेटरचा वाद, खाजगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची होणारी लूट, लसीकरणाची रखडलेली मोहिम या सगळ्याच गोष्टींवरून जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात खटके उडतांना दिसत आहेत.

नुकत्याच झालेल्या बैठकीत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, भाजपचे डाॅ. भागवत कराड, आमदार अतुल सावे यांच्यात केंद्राने पाठवलेल्या व्हेंटिलेटरवरून वाद झाला. जिल्हा प्रशासन, पोलिस, आरोग्य  व वैद्यकीय विभाग आपापल्यापरीने या परिस्थितीला तोंड देत आहेत. परंतु काही प्रमुख निर्णय, निधीची उपलब्धता या संदर्भात पालकमंत्री सुभाष देसाई हेच निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे त्यांनी जिल्ह्याचा एखादा दौरा करून कोरोना परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

जालन्याला झुकते माप?

शेजारी असलेल्या जालना जिल्ह्याला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यामुळे फायदा होत असून औरंगाबादच्या मानाने रुग्णसंख्या, मृत्यूदर कमी असून देखील रेमडेसिव्हर, आॅक्सिजन व इतर सुविधांच्या बाबतीत जालना जिल्हा उजवा ठरत आहे. त्या उलट औरंगाबादची परिस्थिती गंभीर असून देखील इथे अनेक गोष्टींचा तुटवडा जाणवत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. पालकमंत्र्यांचे जिल्ह्याकडे होत असलेले दुर्लक्षच याला जबाबदार असल्याचा आरोप भाजपने पत्रकार परिषद घेऊन नुकताच केला आहे.

आता कोरोनाच्या संकटात भाजप विरुद्ध सत्ताधारी शिवसेना यांच्यात या मुद्यावरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यााठी जिल्ह्यात कठोर निर्बंध लादण्यात आलेले आहेत. यात आणखी वाढ हेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजचा लाभ देखील अद्याप अनेकांना मिळालेला नाही, अशी ओरड देखील होत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जिल्ह्याचा दौरा करावा, अशी मागणी होत आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com