खतांच्या वाढत्या किंमतीबाबत सुभाष देसाई म्हणाले ..

रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे. याबाबत राज्य शासन केंद्र शासनाशी चर्चा करणार.
Khrip Review Meeting News Aurangabad
Khrip Review Meeting News Aurangabad

औरंगाबाद ः औरंगबाद जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या जोडण्या प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे. शेतीसाठी वीज हा महत्वाचा घटक असल्याने यात असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तात्काळ ऊर्जामंत्री यांच्यासमवेत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषी पंपांच्या जोडण्या पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. (Will discuss with the central government about the rising prices of fertilizers, said guardian minsiter Subhash Desai) रासायनिक खंताच्या वाढत्या किंमती संदर्भात केंद्राशी चर्चा करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

पालकमंत्री  देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. (District level kharif pre-season review meeting was held) यावेळी पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात कापुस आणि मक्याचे क्षेत्र वाढत आहे, याअनुषंगाने देखील विभागाने नियोजन करावे.  इतर पिकांचे बियाणे तसेच खत शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात मिळण्यासाठी नियोजन करावे.

मागच्या वर्षी अनेक ठिकाणी सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी पाहता सोयाबीन बियाणे उत्पादन करणाऱ्या बियाणे कंपन्यानी पुन्हा ही तक्रार येऊ देऊ नये. रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे. (Can farmers be subsidized? This will also be tried.) याबाबत राज्य शासन केंद्र शासनाशी चर्चा करणार असून हा प्रश्न कसा सोडविता येईल याबाबत मार्ग काढला जाईल किंवा या बाबतीत शेतकऱ्यांना सबसिडी देता येईल का? याचे देखील प्रयत्न करण्यात येतील.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सर्वप्रथम सादरीकरणाव्दारे जिल्ह्यातील कृषी बाबत माहिती  दिली.  जिल्ह्यामध्ये मागील ५ वर्षात खरीप हंगामाचे पिकाखालील सरासरी क्षेत्र ६७५१७१ हेक्टर असून कापूस व मका ही दोन प्रमुख पिके आहेत. (Tur, considering the increased rates of soybeans, an increase in the area of both crops is expected.) या दोन पिकांचे सरासरी क्षेत्र अनुक्रमे ३.९४ लक्ष हेक्टर व १.७२ लक्ष हेक्टर असून चालू वर्षी खरीप हंगामात तुर, सोयाबीनचे वाढलेले दर लक्षात घेता दोन्ही पिकांच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे.

खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये ६.८१ लक्ष हेक्टरवर पेरणी अपेक्षित असून कापूस पिकाखाली ३.९९ लक्ष हेक्टर, मका १.५५, तुर ०.४२  व सोयाबी ०.२० लक्ष हेक्टर पेरणी अपेक्षित आहे. खरीप हंगामातील अपेक्षित पेरणी क्षेत्रासाठी पिकनिहाय लागणाऱ्या बियाण्याचे नियोजन केले आहे. (A total of 43316 quintals of supply was planned from public and private sector seed growers.) यासाठी सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील बियाणे उत्पादकांकडून एकुण ४३३१६ क्विटंल पुरवठा निंयोजन करण्यात आले आहे. या नियोजनाप्रमाणे बियाणे पुरवठा होण्यास सुरुवात झाली असून कापुस ३९३५३७ पाकीटे, मका ११०९५ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झालेला आहे.

बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध..

सोयाबीन पिकाचे बियाणे वगळता इतर सर्व पिकांचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. सोयाबीन पिकाचे बियाणे उपलब्ध करुन देण्याबाबत महाबीजसह इतर कंपन्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. खरीप हंगाम २०२१ साठी लागणारी बियाणे, खते यांचे नियोजन करण्यात आले असुन पुरवठा नियोजनाप्रमाणे जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरु झालेला आहे.

खरीप हंगामासाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रासाठी केंद्र शासनाकडे मागणी केल्याप्रमाणे युरिया ९९४५० डिएपी २६९५०, एमोपी १२३५०, संयुक्त खते ८७२२० आणि एसएसपी २९८४० असे एकुण २५५८.१० मेट्रीक टन आवंटन मंजुर केलेले आहे.  त्यानुसार माहे एप्रील पासून जिल्ह्यात खतांची आवक सुरू झालेली आहे . १७ मे पर्यंत ४९८२५ मे.टन खत पुरवठा झालेला असुन मागील शिल्लक साठा ११८१८७ मेट्रीक टनसह एकुण १६८०२८ मे.टन खतांची उपलब्धता करण्यात आलेली आहे.

सोयाबीन बियाण्याच्या उगवणशक्ती बाबत मागील हंगामात आलेल्या तक्रारी लक्षात घेवून कृषि विभागाकडून मागील वर्षभरात घरगुती सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याबाबत उन्हाळी सोयाबीन बियाणे उत्पादन करण्याबाबत जनजागृती केल्यामुळे ८६०० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांच्या स्तरावर उपलब्ध झाले आहे. उर्वरित बियाणे बियाणे कंपन्यांकडून पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून याबाबत गुणवत्ता तपासून घेण्याचे अभियान घेण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com