बिलोली-देगलूर पोटनिवडणूकीत काॅंग्रेस बाजी मारणार? की भाजपचा पंढरपूर पॅटर्न सरस ठरणार.. - Will Congress win in Biloli by-election? That BJP's Pandharpur pattern will be great .. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

बिलोली-देगलूर पोटनिवडणूकीत काॅंग्रेस बाजी मारणार? की भाजपचा पंढरपूर पॅटर्न सरस ठरणार..

अभय कुळकजाईकर
रविवार, 20 जून 2021

नांदेड जिल्हा हा कॉँग्रेसचा आणि अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे त्यावर पकड ठेवण्यासाठी  चव्हाण यांचे प्रयत्न सुरूच आहेत.

नांदेड ः देगलूर - बिलोली पोटनिवडणुकीसाठी सत्ताधार महाविकास आघाडी विरुध्द भाजप असा सामना रंगणार आहे. कॉँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे नुकतेच निधन झाले होते. (Will Congress win in Biloli by-election? That BJP's Pandharpur pattern will be great) आता ही जागा काॅंग्रेस कामय राखणार? की भाजप धक्का देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची या निमित्ताने प्रतिष्ठापणाला लागली आहे. 

मतदारसंघाच्या पुर्ऩरचनेत २००९ मध्ये देगलूर बिलोली हा मतदारसंघ राखीव झाला आणि पहिल्याच निवडणुकीत कॉँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर हे विजयी झाले होते. (Gardiuan Minister Ashok Chavan) त्यानंतर २०१४ मध्ये या मतदारसंघात शिवसेनेचे सुभाष साबणे यांनी ही जागा जिंकली होती. (Bjp Leader Devendra Fadanvis) पुन्हा  २०१९ मध्ये काॅंग्रेसने ही जागा खेचून आणली आणि रावसाहेब अंतापूरकर विजयी झाले. शिवसेनेच्या साबणे यांचा पराभव करत त्यांनी २०१४ ची परतफेड केली होती, 

परंतु गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाचे संकट आले आणि यातच आमदार अंतापूरकर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. (Bjp Mp Prataprao Patil Chikhlikar) त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर आता पोटनिवडणूक होत आहे. काॅंग्रेसने ही जागा राखण्यासाठी जोर लावला आहे, तर पंढरपूर पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपने देखील कंबर कसली आहे.

भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडचा दौरा केला होता. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी मुक्कामी थांबून भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही बिलोली, देगलूर भागाचा दौरा केला. त्यामुळे भाजप देखील ताकदीने या निवडणुकीत उतरणार हे स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी देखील गेल्या आठवड्यात बिलोली, देगलूरचा दौरा केला.  विविध विकासकामांची उद्‍घाटने करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नांदेड जिल्हा हा कॉँग्रेसचा आणि अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे त्यावर पकड ठेवण्यासाठी  चव्हाण यांचे प्रयत्न सुरूच आहेत. आता पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपणार आहे.

भाजपकडून पंढरपूर पॅटर्न

पंढरपूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने महाआघाडीवर मात करत ती जागा खेचून आणली. त्यामुळे देगलूर - बिलोलीतही पुन्हा पंढरपूर पॅटर्न करण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे. त्यावर महाआघाडीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. सदरील जागा कॉँग्रेसची असल्याने त्यांचा दावा आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेने जागा लढविल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश आणि माजी आमदार सुभाष साबणे हे काय निर्णय घेणार? याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉँग्रेसचा निर्णय काय राहणार आणि देगलूर - बिलोलीतील विविध प्रमुख पक्षातील स्थानिक नेतेमंडळी कोणती भूमिका निभावणार? यावरही बरेच काही अवलंबून आहे.

हे ही वाचा ः सोमवारी संभाजीराजे नाशिकला काय घोषणा करणार?

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख