धिरज देशमुख, रमेश बागवे यांच्यावर गुन्हे दाखल का केले नाहीत?

रमेश बागवे व आमदार धीरज देशमुख यांच्या उपस्थितीतपाच तास धरणे सुरू होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.
Latur Congress-Bjp News
Latur Congress-Bjp News

लातूर ःकेंद्र सरकारच्या विरोधात लातूर शहरात काँग्रेसच्या वतीने २७ मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. जमावबंदी आणि कुठलेही राजकीय आंदोलन करण्यास परवानगी नसतांना हे आंदोलन केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून काॅंग्रेस कार्यकर्त्यां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. पण आमदार धिरज देशमुख आणि महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसचे उपाध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्यावर मात्र कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. कार्यकर्त्यांवर गुन्हे, नेत्यांवर का नाही? असा सवाल आता भाजपने उपस्थित केला आहे.

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत आहे. पाचशेहून अधिक रुग्ण रोज आढळत असल्याने जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे नियम कडक केले आहेत. जमावबंदी, राजकीय आंदोलनांना मज्जाव असतांना शुक्रवारी काॅंग्रेसच्या वतीने शहरात केंद्र सरकार विरोधात एकदिवसीय उपोषण करण्यात आले.

यावेळी काॅंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी मास्क घातलेले नव्हते, शिवाय सोशल डिस्टनचा देखील फज्जा उडाला होता. यावरून टीका सुरू असतांनाच आता या आंदोलन प्रकरणात जिल्हा प्रशासनाने काही काॅंग्रेस कार्यकर्त्यांवर थातूर-मातूर कारवाई करत आव आणला आहे.

विशेष म्हणजे ज्या लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख आणि काॅंग्रेसचे नेते माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले, त्यांच्यावर मात्र कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. भाजपने नेमका हाच मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला आहे.

रमेश बागवे व आमदार धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत पाच तास धरणे  सुरू होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. मात्र पोलिस दप्तरी देशमुख व बागवे या दोघांची कुठलीही नोंद नाही. ती का करण्यात आली नाही?असा सवाल भाजपा नेते व्यंकटराव पनाळे यांनी केला आहे.

पोलिसांनी कोरोना साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करत घोषणाबाजी केली म्हणून रमेश बागवे आणि धीरज देशमुख यांच्यावरही कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु पोलिसांनी मोजक्या आंदोलकावर गांधी चौक पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केल्याचा आरोप देखील पनाळे यांनी केला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com