आमदार पवारांचे उपोषण रेशन घोटाळ्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी का?

गेवराई तालुक्यात कापसाची व तुरीची खरेदी शासनाच्या वतीने सुरू असताना ती सुरू करा म्हणून तुम्ही उपोषण करता. हे नाटक कशासाठी ? तुमची निष्क्रियता लपावण्यासाठी साठीच का ? आमदार महोदय हे वागणं बरं नव्हं. आता लोक हुशार झाले आहेत.
mla pawar and vijaysinh pandit news gaeorai
mla pawar and vijaysinh pandit news gaeorai

गेवराई - कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वसामान्य लोकांच्या हक्काचे रेशनवरील धान्य भाजपच्या कार्यकर्त्याने पळवून घोटाळा केल्याचे नुकतेच घडकीस आले होते. त्यानंतर काही दिवसांतच भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी शासकीय खरेदी नव्याने नोंदनी घेवून कापूस, तूर, हरभरा खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावेत व कापूस खरेदी केंद्र तसेच रोज घेण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर गुरुवारी भर उन्हात उपोषण केले. त्यानंतर तालुक्यात राजकारणाला सुरूवात झाली असून आमदार पवार यांचे हे उपोषण म्हणजे नौटंकी असल्याची टिका माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडीत यांनी केली आहे.  

भाजप कार्यकर्त्याकडून धान्य घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर ही साखळी तोडण्यची आपण घेतलेली भीष्म प्रतिज्ञा सोईस्कर विसरलात, रेशन घोटाळ्याच्या सखोल चौकशीसाठी तुम्ही आंदोलन कराल असे वाटले होते, मात्र उपोषणाची नौटंकी रेशन घोटाळ्यातून लक्ष विचलीत करण्यासाठी आहे का? असा प्रश्न सामान्य माणसाला पडत असल्याचे सांगत विजयसिंह पंडित यांनी पवार यांच्या आंदोलनावर टिका केली. 

आमदार लक्ष्मण पवार यांच्या उपोषणाची गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खिल्ली उडवली. सोशल मिडियावर या आंदोलनाला नौटंकी संबोधत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टिका सुरू केल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी देखील यात उडी घेतली आहे. पंडीत म्हणाले, र्केद्र सरकारच्या माध्यमातून सीसीआय कडून तालुक्यात कापूस खरेदी सुरू आहे, खरेदी केंद्राच्या क्षमतेनुसार खरेदी करा, असे आदेश राज्य सरकारने दिलेले असतांना ग्रेडर त्याची अंमलबजावणी करत नाहीत. आमदार महोदयांनी केंद्रातील भाजपा सरकारकडे आपला शब्द खर्च करून सीसीआयचे खरेदी केंद्र वाढवले पाहिजे होते.

खाजगी बाजार समितीच्या माध्यमातून धान्य खरेदी करायला पाहिजे होती, हे सर्व सोडून केवळ राजकारण करत उपोषण सुरू केले आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन संकटाला तोंड देणे आवश्यक असतांना लोकांना मदत न करता केवळ आंदोलनाचा खटाटोप सुरू आहे. भाजप कार्यकर्त्याने केलेल्या रेशन घोटाळ्यामुळे तालुक्याची राज्यभरात बदनामी झाली आहे.

तालुक्यात रेशन माफियांनी धुमाकूळ घातला आहे, वाळू तस्करांनी उच्छांद मांडला आहे. त्यातच बोगस कामे करणाऱ्या गुत्तेदारांमुळे पांढरवाडी सारख्या अनेक डांबरी रस्त्यांची वर्षाच्या आत वाट लागली आहे. अनेक गावांमध्ये पाणी टंचाई असताना पंचायत समितीच्या वतीने किती गावात टँकर सुरू झाले ? मजुरांच्या हाताला काम नाही, अशा परिस्थितीत पंचायत समितीच्या वतीने रोहयोची किती कामे सुरू झालीत?, शहरात जुन्या रस्त्यांवर एक लेयर टाकून थातुरमातुर कामे सुरू आहेत. 

आमदार साहेब हे वागणं बर नव्हं...

शहरातील अनेक भागांमध्ये पाणी नाही, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, राष्ट्रीयकृत बँका, शासकीय कार्यालये दलालांच्या विळख्यात आहेत.निराधारांना आधाराची, बेरोजगारांना रोजगाराची गरज आहे. अशा अनेक संकटांना लोक तोंड देत आहेत. कोरोना संकटात आमदार म्हणून तुम्ही सामान्य लोकांसाठी काय केले, कोणती मदत केली हे सुद्धा उपोषण करण्यापूर्वी सांगितले पाहिजे असे, म्हणत विजयसिंह पंडित यांनी आमदार लक्ष्मण पवार यांच्यावर तोंडसुख घेतले.

 गेवराई तालुक्यात कापसाची व तुरीची खरेदी शासनाच्या वतीने सुरू असताना ती सुरू करा म्हणून तुम्ही उपोषण करता. हे नाटक कशासाठी ? तुमची निष्क्रियता लपावण्यासाठी साठीच का ? आमदार महोदय हे वागणं बरं नव्हं. आता लोक हुशार झाले आहेत. तुम्हीच आमदार, नगर परिषद तुमची, पंचायत समिती तुमची,  खाजगी बाजार समिती तुमची असे सत्तेचे अनेक केंद्र तुमच्या ताब्यात असताना तुम्ही उपोषण करत आहात हे नाटक आता लोकांना चांगलं माहिती झाले आहे. सगळी सत्ता तुमची आणि उपोषणही तुमचे ? जमलं तुम्हाला, असा टोला शेवटी विजयसिंह पंडित यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com