आम्हाला रेमडेसिविर का मिळत नाही? आम्ही पाकव्याप्त कश्मिरात राहतो का?

बीड जिल्ह्यात रेमडीसीवीरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असून काळाबाजारही वाढला आहे. सरकारी यंत्रणा देखील हतबल झाल्याचे चित्र आहे.
Bjp Mla Suresh Dhas- Beed Collector Clash News
Bjp Mla Suresh Dhas- Beed Collector Clash News

बीड : आम्ही काय पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहोत काय? आष्टी, शिरूर तालुका पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे काय, आम्हाला रेमडीसीवीर इंजेक्शन्स का मिळत नाहीत, असा सवाल भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या भेटीत धस यांनी आपला संताप व्यक्त केला.  

कोरोना आढावा बैठकीत धस यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनीही खुर्चीवरुन उठून धसांच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वेगाने वाढत असून रुग्णसंख्या ४४ हजारांच्या घरात पोचली आहे. सध्या साधारण दहा हजारांवर रुग्ण सक्रीय असून सहा हजारांवर रुग्ण उपचाराखाली आहेत.

मागच्या पंधरवाड्यापासून जिल्ह्यात रेमडीसीवीर इंजेक्शन्स आणि  ऑक्सीजन तुटवडा जाणवतो आहे. तो उपलब्ध करताना प्रशासनाचीही मोठी कसरत होत आहे. दरम्यान, रेमडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी नातेवाईक दोन - दोन दिवस ठाण मांडून बसत आहेत. तरीही इंजेक्शन भेटण्याची खात्री नाही.

दरम्यान, याच मुद्द्यावर भाजप आमदार सुरेश धस जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले. लोक रांत्रदिवस रेमडिसीवीर इंजेक्शन्साठी इकडे तिकडे फिरत आहेत. तुम्ही नुसते कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप करत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी खासगी रूग्णालयांतले इंजेक्शन जप्त करत आहेत, पण ते जातात कुठे असा सवाल धस यांनी बैठकीत केला. 

उद्यापर्यंत रेमडिसीवर इंजेक्शन व्यवस्थीतपणे सर्वांना मिळाले नाही तर आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. आक्रमक झालेल्या धस यांची समजुत काढत जिल्हाधिकाऱ्यांनी वितरणाची व उपलब्धतेची  माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसण करण्याचा प्रयत्न केला. 

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com