कुणी लस घेता का लस.. औरंगाबादेत वीस हजार डोस पडून..

नागरिकांना देखील लस मिळत नसल्याने अनेक केंद्रावर रांगा, व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
Corona Vaccine twenty Thousand Doses- Aurangabad News
Corona Vaccine twenty Thousand Doses- Aurangabad News

औरंगाबाद ः कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना पुर्णपणे अजून नाहीसा झालेला नाही, त्याआधीच लोकांमधील बेफिकरपणा वाढल्याचे समोर आले आहे. ४५ वर्षावरील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करून देखील त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने शहरात तब्बल २० हजार डोस पडून आहेत. (Why does anyone get vaccinated .. Twenty thousand doses fell in Aurangabad) त्यामुळे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करतांनाच लस न घेता बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

महापालिकेच्या वतीने शहरात लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. ४५ वर्षावरील दीड लाखाहून अधिक नागरिकांनी कोरोना लस घेतली आहे. (The second dose was also well received by the citizens.) दुसऱ्या डोसला देखील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून लस घ्यायला लोक येत नसल्याचे समोर आले आहे.

राज्य सरकारने १ मे महाराष्ट्र दिनापासून १८ वर्षापुढील तरूणांसाठी लसीकरण मोहिम सुरू केली होती. परंतु लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने सध्या राज्य शासनाने ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणावरच भर दिला आहे. (Due to non-availability of vaccines, queues and confusion were created at many centers) मध्यंतरी या नागरिकांना देखील लस मिळत नसल्याने अनेक केंद्रावर रांगा, व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात संतापही व्यक्त केला.

सध्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने खाली आली आहे. मृत्यूदर देखील कमी झाला आहे. औरंगाबादकरांसाठी ही आनंदाची गोष्ट असली तरी लसीकरणासाठी दुर्लक्ष होता कामा नये. सध्या शहरात लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु नागरिकांनी या लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.

लोकांचा प्रतिसाद नसल्यामुळे २० हजार डोस सध्या महापालिकेकडे पडून आहेत. अचनाक लोकांनी लसीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने महापालिका प्रशासनही चिंतेत पडले आहे. ४५ वर्षावरील तीन लाखाहून अधिक नागरिकांनी अद्याप लस घेतलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची लस घेऊन आपला संसर्गपासून बचाव करावा, यासाठी महापालिकेचे अधिकारी प्रयत्नशील आहेत.

महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी यापुर्वीच लस न घेता बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता. कोरोनाची दुसरी लाट संपत असली तरी आपण तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहोत. असे असतांना नागरिकांनी कोरोना लस घेण्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर आता महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com