मुख्यमंत्र्यांना त्रास देणाऱ्या भाजपला सोबत का घेतले? खैरे नाराज

राज्यात भाजपने शिवसेनेच्या विरोधात आघाडी उघडलेली असतांना विरोधी पक्षनेते फडणवीस शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी दिल्लीच्या वाऱ्या करत असतांना स्थानिक नेत्यांनी अशा पद्धतीने भाजपशी हातमिळवणे करणे अजिबात योग्य नाही.
Aurangabad District Bank Election News
Aurangabad District Bank Election News

औरंगाबाद: जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे जिल्ह्यातील तीन नेत्यांनी भाजपशी हात मिळवणी करत पॅनल उभे केल्याने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची नाराजी ऐन मतदानाच्या दोन दिवसआधी समोर आली आहे. राज्यात सत्ता असलेल्या शिवसेना विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्रास देणाऱ्या भाजपला सोबत का घेतले? असा सवाल करत चंद्रकांत खैरे यांनी रोहयो मंत्री संदीपान भुमरे, महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्यावर तोफ डागली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या १८ जागांसाठी २१ रोजी मतदान होत आहे. परंतु या निवडणुकीतील गट-तट आणि नाराजी आता उफाळून आली आहे. मतदान ४८ तासांवर आलेले असतांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भुमरे, सत्तार, दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे.

एका वृत्त वाहिनीशी बोलतांना खैरे म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करून निवडणूक लढवायची असे ठरले होते. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काॅंग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन जिल्हा बॅंक ताब्यात घेण्याचे ठरले होते.

परंतु नंतरच्या काळात भुमरे, सत्तार, दानवे यांनी मला विश्वासात न घेता भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांच्याशी चर्चा करून त्यांना सोबत घेत शेतकरी विकास पॅनल तयार केले. राज्याच्या राजकारणात भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे पदोपदी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी कुटील राजकारण करत आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन तेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या व इतर निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय झाला होता.

राज्यात भाजपने शिवसेनेच्या विरोधात आघाडी उघडलेली असतांना विरोधी पक्षनेते फडणवीस शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी दिल्लीच्या वाऱ्या करत असतांना स्थानिक नेत्यांनी अशा पद्धतीने भाजपशी हातमिळवणे करणे अजिबात योग्य नाही. शिवसेना नेता म्हणून मला हे अजिबात पटलेले नाही, आता या संदर्भात संबंधिताबद्दल काय निर्णय घ्यायचा ते वरिष्ठ नेते ठरवतील असेही खैरे म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com