नागपुरातील कोरोना संघाला का रोखता आला नाही?

माझ्या परभणीत न येण्याबद्दल देखील विरोधकांकडून टिका सुरू आहे, पण सध्या माहिती तंत्रज्ञनाच्या वापरामुळे प्रत्यक्ष न येता देखील कामे केली जाऊ शकतात. माझा जिल्हाधिकाऱ्यांशी दररोज व्हिसीच्या माध्यमातून संपर्क असतो. त्यामुळे परभणीत येत नसलो तरी जिल्ह्यातील प्रश्नावर मी लक्ष ठेवून आहे.
minister nawab malik news parbhnai
minister nawab malik news parbhnai

परभणी ः मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यकर्त्यामुळे कोरोना आटोक्यात आल्याचा दावा केला जातोय, मग संघाचे माहेर घर असलेल्या नागपूरात संघाला कोरोना का रोखता आला नाही?, असा टोला राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा मलिक यांनी परभणीत घेतला. यावेळी त्यांनी धारावीतील कोरोना रोखण्यात संघाची भूमिका महत्वाची होती, असा दावा करणाऱ्या भाजपला फटकारले. 

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना मलिक म्हणाले, धारावीत संघाच्या कामामुळे कोरोना आटोक्यात आला तर संघाचे मुख्य केंद्र असलेल्या नागपुरात कोरोना का कंट्रोल मध्ये येत नाही. कोरोना रोखण्यासाठी  राज्यशासनाची आरोग्य यंत्रणा, अधिकारी यांचे काम मोलाचे होते, त्यामुळे विरोधकांनी उगीच त्यांना कमी लेखू नये.

माझ्या परभणीत न येण्याबद्दल देखील विरोधकांकडून टिका सुरू आहे, पण सध्या माहिती तंत्रज्ञनाच्या वापरामुळे प्रत्यक्ष न येता देखील कामे केली जाऊ शकतात. माझा जिल्हाधिकाऱ्यांशी दररोज व्हिसीच्या माध्यमातून संपर्क असतो. त्यामुळे परभणीत येत नसलो तरी जिल्ह्यातील प्रश्नावर मी लक्ष ठेवून आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने तसेच रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणखीन दोन दिवस संचारबंदी वाढवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन घेण्यात आला आहे. शनिवारपासून शहरासह जिल्ह्यात सर्व नागरी व ग्रामीण क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य पथकांच्या माध्यमातून डोअर-टू-डोअर व्यापक सर्व्हेक्षण मोहिम हाती घेण्यात यावी अशा सूचना देखील यावेळी पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिल्या. 

या सर्व्हेक्षणातून कोरोना संदर्भात काही लक्षणे आढळतात का, याबाबतचे सर्व्हेक्षण करावे. तसेच या सर्व्हेक्षणातून अन्य गोष्टी सुद्धा पुढे येण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना आपापल्या घरामधूनच (होम क्वारंटाईन) बंदिस्त राहण्यास जिल्हा प्रशासनाद्वारे मुभा देण्यात येणार असल्याचे मलिक म्हणाले.

आमदार, खासदार निधीतून रु्ग्णवाहिका घ्या..

जिल्ह्यात रुग्णवाहिकांची संख्या पुरेशी नाही. याकरीता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाकरिता १६ रूग्णवाहिका लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करण्याच्या सूचनाही दिल्या.

यासाठी जिल्ह्यातील दोन खासदार व सहा आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी 2 रुग्णवाहिका खरेदी करता येवू शकतात. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सर्व लोकप्रतिनिधीबरोबर चर्चा करुन रुग्णवाहिका खरेदीसाठी तातडीने निधी उपलब्ध होण्याबाबची कार्यवाही करावी.

जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत.  त्यामुळे मुळचे परभणीतील मात्र मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना परभणीत पाचारण करण्या संदर्भात विचार विनिमय सुरू असुन १२ ते १४ डॉक्टर्स उपलब्ध झाल्यास निश्चीतच कोरोना विरूद्ध लढा देण्यास मदत होईल, असा विश्वासही पालकमंत्री मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.

Edited By : Jagdish Pansare


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com