नांदेड जिल्हा बॅंक कुणाच्या ताब्यात जाणार?

गेल्यावेळी बॅंकेवरभाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या संचालकांनी एकत्र येऊन सत्ता मिळविली होती. त्यावेळी चिखलीकर काॅंग्रेसला एकाकी पाडण्यात यशस्वी ठरले होते.
Nanded District Bank- Pratap chikhlikar- Ashok Chavan news
Nanded District Bank- Pratap chikhlikar- Ashok Chavan news

नांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण २१ पैकी १८ जागेसाठी शुक्रवारी ९८ टक्के मतदान झाले. जिल्हा बँक निवडणूकीसाठी एकूण ९४० मतदात्यापैकी ७९५ पुरुष, १४५ महिला मतदार आहेत. भोकर, कंधार, धर्माबाद, हदगाव, मुखेड आणि माहूर या सहा तालुक्यात शंभर टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीत महाआघाडी प्रणीत ‘समर्थ’ सहकार पॅनल व भाजप प्रणीत सहकार ‘विकास’ पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे.

महाआघाडीचे नेतृत्व पालकमंत्री अशोक चव्हाण तर भाजपाचे नेतृत्व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. दोन्ही राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लागली असून जिल्हा बॅंकेवर कुणाचे वर्चस्व राहाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. रविवारी (ता. चार) सकाळी तहसिल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

नांदेड जिल्हा बॅंकेच्या २१ पैकी ३ जागा या आधीच बिनविरोध झाल्या आहेत. यात काॅंग्रेस, राष्ट्रवादी व भाजपला प्रत्येकी एक जागा मिळाली. आता उर्वरित १८ जागांमध्ये कोण बाजी मारणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकी निमित्ताने पालकमंत्री अशोक चव्हाण आणि जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे पुन्हा एकदा समोरासमोर आले आहे.

प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अर्जावर आक्षेप घेत तो रद्द करण्यात आला होता. पण नंतर न्यायालयाने चिखलीकरांचा अर्ज वैध ठरवत त्यांचा निवडणुक लढवण्याचा मार्ग मोकळा केला.  सर्वोच्च न्यायालयाने  दिलास दिल्यानंतर चिखलीकर यांनी बँकेच्या निवडणुकीसाठी लोहा सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केला. या शिवाय त्यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर हे देखील मैदानात आहेत. 

गेल्यावेळी बॅंकेवर भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या संचालकांनी एकत्र येऊन सत्ता मिळविली होती. त्यावेळी चिखलीकर काॅंग्रेसला एकाकी पाडण्यात यशस्वी ठरले होते. परंतु गेल्या पाच वर्षात जिल्ह्याच्या राजकारणात अनेक बदल घडले. निवडणुकीत चिखलीकर व अशोक चव्हाण यांच्या पॅनेलमध्ये सरळ लढत होत आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com