राष्ट्रवादीचे राजेश विटेकर कोण आहेत?

जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क असल्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना परभणी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.
Ncp Leader Rajesh Vitekar- Wommans Allegation News Parabhani
Ncp Leader Rajesh Vitekar- Wommans Allegation News Parabhani

परभणी ः राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्ह्यातील नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व सोनपेठ बाजार समितीचे सभापती राजेश विटेकर हे सध्या त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आले आहेत. कोण आहेत विटेकर? राजकारणात ते कसे आले? त्यांची पार्श्वभूमी काय? राज्य पातळीवर कोणत्या बड्या नेत्यांशी त्यांची जवळीक होती याबद्दल उत्सूकता आहे.

राजेश विटेकर हे राष्ट्रवादी कॉग्रेसचे परभणी जिल्ह्यातील नेते म्हणून ओळखले जातात. वडिल माजी आमदार उत्तमराव विटेकर यांच्याकडून त्यांना राजकीय वारसा मिळाला.  विटा ग्रामपंचायत सदस्य, सरपंच म्हणून त्यांनी राजकारणाला सुरूवात केली. सोनपेठ बाजार समितीचे सभापती ते परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.

जिल्ह्यातील स्थानिक राष्ट्रवादीचे नेते बाबाजणी दुर्राणी, खासदार फौजिया खान यांचे विश्वासू म्हणून देखील विटेकर ओळखले जातात. राज्य पातळीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी देखील त्यांचे चांगले संबंध आहेत.

जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क असल्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना परभणी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. शिवसेनेचे संजय जाधव यांना विटेकर यांनी चांगली लढत दिली, पण त्यांचा ४२ हजार मतांनी पराभव झाला. 

विटेकर यांचे वडिल उत्तमराव विटेकर हे शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये परभणी तालुक्यातील सिंगनापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होते, तर त्यांच्या आई निर्मला विटेकर या जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा आहेत. जिल्ह्यातील महत्वपूर्ण राजकीय घराण्याशी त्यांचे नाते आहे. त्यामुळे सातत्याने  विटेकरां यश मिळत गेले.  विटा (ता.सोनपेठ) या गावाचे सरपंच, त्यानंतर सोनपेठ बाजार समितीच्या प्रशासक पदावर निवड, त्याच कालावधीत  वडगाव (ता.सोनपेठ) जिल्हा परिषद गटातून परभणी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही ते  निवडून आले. 

त्यानंतर अडीच वर्षासाठी परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून विटेकर यांची निवड करण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेते देखील ते  निवडून आले आहेत. या शिवाय छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे ते सचिव देेखील आहेत.

या संस्थे अंतर्गत रामकृष्ण बापू विद्यालय चालवले जाते. याच विद्यालयातील एका महिला शिक्षिकेने राजेश विटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com