डाॅ. कराडांच्या मुलांना मोदी म्हणाले, तुम्ही पण डाॅक्टर आहात का?

हर्षवर्धन यांनी मास्क काढू का? असे नम्र्पणे विचारले. यावर माझ्यासोबत आता दोन डाॅक्टर आहेत? काही हरकत नाही म्हणत, आनंदाने फोटो काढले.
डाॅ. कराडांच्या मुलांना मोदी म्हणाले, तुम्ही पण डाॅक्टर आहात का?
Central Minister Dr.Bhagwat Karad and Family Meet Pm Modi News Aurangabad

औरंगाबाद ः केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी आपली जनआशिर्वाद यात्रा नुकतीच पुर्ण केली. मराठवाड्यातील पाच लोकसभा मतदारसंघात कराड यांनी दोन टप्यात दौरा करत केंद्रातील मोदी सरकार जनतेच्या हिताच्या राबवत असलेल्या योजनांची माहिती घरोघरी जाऊन दिली. (When the Minister of State for Finance met his family, Modi said, "Are you also a doctor?) जनआशिर्वाद यात्रेला मिळालेला उत्सफूर्त प्रतिसाद, शेतकरी, कामगार व सर्व सामान्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दिलेल्या भेटवस्तू याची माहिती देण्यासाठी डाॅ. कराड यांनी दिल्लीत काल कुटुंबासह मोदींची भेट घेतली.

यावेळी त्यांच्या सोबत पत्नी डाॅ. अजली कराड, मुलगा हर्षवर्धन, वरूण, सुन रश्मी आणि नात अविशा देखील होती. केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर डाॅ. कराड यांची पंतप्रधानांची ही पहिलीच सहकुटुंब भेट होती. (Prime Minister Narendra Modi) या भेटीत मोदींनी डाॅ. अंजली कराड यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांची विचारपूस केली. कराड पती-पत्नी हे दोघे डाॅक्टर असल्यामुळे त्यांची दोन्ही मुले हर्षवर्धन व वरूण देखील डाॅक्टर आहेत का? या उत्सूकतेपोटी त्यांनी तुम्ही पण डाॅक्टर आहात का? अशी विचारणा केली.

त्यावर हर्षवर्धन कराड यांनी आपण फार्मास्युटिकल व्यवसायात असल्याचे मोदींना सांगितले. ( Central State Fianance Minister Dr.Bhagwat Karad) काही मिनिटांच्या या भेटीत मोदींनी कराड यांची नात हिला चाॅकलेच तिच्याशीही मराठीत संवाद साधला. शिवाय कराड यांच्या सून रश्मी यांचीही विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढतांना कराड यांचे चिरंजीव हर्षवर्धन यांनी मास्क काढू का? असे नम्र्पणे विचारले. यावर माझ्यासोबत आता दोन डाॅक्टर आहेत? काही हरकत नाही म्हणत, आनंदाने फोटो काढले.

डाॅ. कराड यांनी आपल्या जनआशिर्वाद यात्रे संदर्भात माहिती देतांनाच मराठवाड्यातील महिला, विद्यार्थीनींनी दिलेल्या राख्या मोदींना भेट दिल्या. या शिवाय केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी मोदींचे आभार मानणारे पत्र कराड यांना दिले होते. ते देखील पंतप्रधानांना देण्यात आले. सोनपेठ तालुक्यातील एका शेतकऱ्यांने दिलेला फेटा देखील कराड यांनी आवर्जून पंतप्रधानांना दिला.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in