मराठा समाजासाठी काय करणार? राज्य सरकार, विरोधी पक्षाने सांगावे..

याआधी ज्यांनी राजीनामे दिले, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता, आता द्यावा का? तर तो दखील ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
Mp Chatrapati Sambhajiraje Bhosle press News Aurangabad
Mp Chatrapati Sambhajiraje Bhosle press News Aurangabad

औरंगाबाद ः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केला असला तरी अनेक गोष्टी राज्य सरकारच्या हातात आहेत. (What will he do for the Maratha community? State Government, Opposition should tell, said Mp Chatrapati Sambhajiraje) राजकारण सोडून मराठा समाजासाठी सरकार आणि विरोधी पक्ष काय करणार? ते सांगावे, असा सवाल खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर ईडब्लूएसचे केंद्राचे  आरक्षण मिळू शकते. मात्र त्यातील जाचक अटी रद्द करण्याची गरज आहे. (Central reservation of EWS can be obtained after repeal of Maratha Reservation Act. However, the oppressive conditions need to be abolished.) त्यासाठी केंद्राकडे जाण्याची गरज नाही, तो विषय राज्य सरकारच्या आखत्यारित येतो, असेही संभाजीराजे म्हणाले.

मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जाऊन आढावा घेत आहेत. काल जालन्यानंतर त्यांनी आज औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसंग्रामचे विनायक मेटे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांच्या विधानाबद्दल विचारलेल्या प्रश्नांना मात्र त्यांनी उत्तरे टाळली. (The next direction will be announced by holding a press conference in Mumbai on 28th) त्यांचे प्रश्न मला कशाला विचारता, माझी भूमिका मांडण्यासाठी मी आलो आहे, असे म्हणत त्यांनी येत्या २८ रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पुढील दिशा जाहीर करणार असल्याचेही सांगितले.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले, आंदोलन करून लोकांचे जीव धोक्यात घालणे चुकीचे ठरेल. बरं आंदोलन कशासाठी करायचे असते, तर आपले म्हणणे शासन दरबारी पोहचवण्यासाठी. (It is not right to force people to take to the streets and endanger their lives.) तर मराठा आरक्षणाचा विषय हा राज्य सरकारला माहित आहे. त्यामुळे पुन्हा त्याच मुद्यावरून आंदोलन करायचे आणि लोकांना रस्त्यावर यायला भाग पाडून त्यांचे जीव धोक्यात घालायचे हे बरोबर नाही.

वेळ आली तेव्हा आंदोलन निश्चित केले जाईल, पण सध्या कोरोनाचा धोका लक्षात घेता ते चुकीचे ठरेल. शेवटी जिवंत राहिलो तर आरक्षण आणि इतर विषय असतील. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अनेक राजकीय पक्ष, नेते पांठिबा देण्यासाठी पुढे येत असले तरी आपल्या पाठीशी समाज भक्कमपणे उभा आहे, आपल्याला इतर कुणाची गरज नसल्याचा पुनरुच्चार देखील संभाजीराजे यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर यापुर्वी अनेकांनी राजीनामे दिले, आताही ते द्यावेत का? या प्रश्नावर देखील याआधी ज्यांनी राजीनामे दिले, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता, आता द्यावा का? तर तो दखील ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझ्या बाबतीत म्हणाल, तर मी सोलापूरात माझी भूमिका स्पष्ट केली आहे. (If my resignation solves the problem, he will resign as an MP tomorrow) आज पुन्हा सांगतो, माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर उद्या खासदारकीचा राजीनामा देईल, या भूमिकेवर मी ठाम आहे.

खासदारकीचा उपयोग चांगल्या कामांसाठी..

पण मी खासदार झाल्यानंतर सर्वप्रथम दिल्लीत शिवजयंती साजरी झाली, राष्ट्रपतीसंह सगळ्या महत्वाच्या नेत्यांनी त्यात सहभाग नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र मी भेट दिल्यानंतर ते राष्ट्रपती भवनात लावण्यात आले. रायगडाच्या जतन आणि संवर्धनचा प्रश्न मी खासदार असल्यामुळेच मार्गी लागला. त्यामुळे खासदारकीचा उपयोग मी चांगल्या कामासाठी केला आहे.

मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात होता तेव्हा, आरक्षण उपसमितीचे  अध्यक्ष अशोक चव्हाण यांना आपण अनेक सूचना केल्या होत्या, राज्य सरकारशी देखील आपण संपर्कात होतो, असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. विनायक मेटे यांच्या मोर्चा संदर्भात विचारले असता, मेटे हे मेटे आहेत, मी संभाजीराजे आहे, याचा पुनरुच्चार करत त्यावर अधिक बोलणे त्यांनी टाळले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com