मराठवाड्याला काय झालंय... आश्वासक नेते अकाली गेले! - What has happened to Marathwada ... Promising leaders left.. | Politics Marathi News - Sarkarnama

मराठवाड्याला काय झालंय... आश्वासक नेते अकाली गेले!

विश्वंभर चौधरी
रविवार, 16 मे 2021

महाराष्ट्र युवक काॅग्रेसचं अध्यक्षपदही दावावर लावून राजीवभाऊ प्रकल्पग्रस्त शेतकर्यांसोबत राहिले. मोर्चे असोत की २१ गावांची महाग्रामसभा सत्ताधारी पक्षाचा हा आमदार प्रत्येक वेळी आम्हा आंदोलनकारींसोबत राहिला.

औरंगाबाद ः राजीवभाऊंची (राजीव सातव) यांची ही दुसरी झुंज होती. अतिशय कमी वयात त्यांनी जीवघेण्या वाताशी पहिली झुंज दिली होती. (This was the second battle of Rajiv Satav. At a very young age, he had his first fight with the deadly wind.) त्यावर मात करून राजकारणात हिंगोली ते दिल्ली अशी अक्षरशः फिनिक्सप्रमाणे भरारी घेतली. तसं पाहिलं तर आमच्या घराची त्यांच्याशी ओळख दोन पिढ्यांची. त्यांच्या आई रजनीताईंच्या काळापासूनची. 

पण राजीव घराणेशाहीतून आलेल्यांपैकी नव्हते. आईची कारकीर्द संपल्यानंतर काही वर्षांनी ते राजकारणात आले. (Rahul Gandhi first tested this diamond.) राहूल गांधी यांनी पहिल्यांदा हा हिरा पारखला. युवक काॅग्रेसचे अध्यक्ष म्हणून झालेली निवड ओळखीतून नव्हती, राहूल गांधींनी चांगला तास दीड तास इंटरव्ह्यू घेऊन त्यांना निवडलं होतं.

मेरिटवर.राजीव यांनी ती निवड इतकी सार्थ ठरवली की राहूल गांधींचा एक मोठा आधार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. या आजारापर्यंत ती साथ चालू होती. राजीव हाॅस्पीटलमध्ये दाखल झाले आणि राहूल गांधी स्वतः सतत त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन होते. (Rahul Gandhi himself was constantly monitoring his health.) अशी साथ आणि असा साथीदार विरळा. आणि अचानक ही साथ संपणं भयंकर दुःखदायक. 

२००९ साली तत्कालीन आघाडी सरकारनं सापळी धरणाची घोषणा केली. प्रकल्प बाधित २१ गावांचे शेतकरी संतप्त झाले. मेधाताईंसह आम्ही सगळे त्यांच्यासोबत लढत होतो. नंदूभाऊ (पत्रकार आणि कळमनुरीचे माजी नगराध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल) यांच्यामुळे आम्ही पुन्हा कनेक्ट झालो. राजीवभाऊंचा मला फोन आला. काय करावं याचा सल्ला मागण्यासाठी. मी त्यांना म्हणालो की तुमच्याच सरकार विरुद्ध तुम्ही लढणं बरं दिसणार नाही, तुमची राजकीय कारकीर्दसुद्धा लोकांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे, आम्ही लढाई निभावून नेऊ.

शेतकऱ्यांसाठी पदाची पर्वा नाही..

पण त्यांच्या अंतर्मनानं हा कौल नाकारला.  दोन दिवसांनी फोन आला की आमदारकी गेली तरी हरकत नाही; अकरा हजार शेतकरी कुटूंब वाचवण्यासाठी ती किंमत कमी आहे. (Rajiv satav also stayed with the project affected farmers by claiming the post of President of Maharashtra Youth Congress.) महाराष्ट्र युवक काॅग्रेसचं अध्यक्षपदही दावावर लावून राजीवभाऊ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत राहिले. मोर्चे असोत की २१ गावांची महाग्रामसभा सत्ताधारी पक्षाचा हा आमदार प्रत्येक वेळी आम्हा आंदोलनकारींसोबत राहिला. विरघळून राहिला. 

त्यानंतर ते दिल्लीत गेले युवक काॅग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून. त्याकाळात मी जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हा तेव्हा त्यांची भेट हा अनिवार्य कार्यक्रम होता. तीनेक वर्षांपूर्वी आमच्या घरी जेवायला आले तेव्हा एकटेच आले. ती घरी झालेली शेवटची भेट.  त्यानंतर बाहेर बरेचदा भेटलो. दिल्लीत आणि पुण्यात. दिल्लीला आंध्र प्रदेश भवनात आम्ही सोबत जेवायचो, कधी महाराष्ट्र सदनात. 

मृदुभाषी, लोकांचं ऐकूण प्रतिसाद देणारा, निगर्वी, मनमिळावू, सर्वांना सोबत घेऊन जाणारा असा हा नेता. प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेचा.  निष्कलंक. मराठवाड्याला नेमकं काय झालंय माहित नाही. प्रमोद महाजन, विलासराव, गोपीनाथराव आणि आता राजीव... आश्वासक नेते अकाली जाण्याचा हा सिलसिला भीतीदायक आहे.  

राजीव सातव यांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं किंवा मराठवाड्याचं नुकसान झालं असं म्हणणं संकुचित होईल. या कठीण कालखंडात देशानं एक अत्यंत आश्वासक, तरूण (वय वर्ष ४६) नेता गमावला आहे. कोरोनानं आपल्यापासून हा 'संसद रत्न' दूर नेला. दुःख करावं तितकं कमी आहे. श्रद्धांजली हा शब्द मणामणाचं ओझं घेऊन बसला आहे. 

अलविदा राजीवभाऊ!

हे ही वाचा : पंचायत समिती सदस्य ते राष्ट्रीय काॅंग्रेसचे नेते : सातव यांचा राजकीय प्रवास..
Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख