करुना शर्मांच्या कारमधील गावठी पिस्तुलचे काय झाले? - What happened to the village pistol in Karuna Sharma's car? jp75 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

करुना शर्मांच्या कारमधील गावठी पिस्तुलचे काय झाले?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

करुना शर्मा यांच्या गाडीत गावठी पिस्तुल सापडले, ते पोलिसांनी हस्तगत केले तर मग आणखी एक गुन्हा का दाखल केला नाही?

पुणे ः परळीत येऊन पत्रकार परिषद घेण्याचा आणि पतीविरोधात अनेक खळबळजनक खुलासे करण्याचा दावा करणाऱ्या करूणा शर्मा चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. अट्राॅसिटी आणि एका महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (What happened to the village pistol in Karuna Sharma's car? ) या प्रकरणात करुना शर्मा यांच्यासह त्यांचा चालक अरुण मोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारामुळे आज दिवसभर परळीत वेगवेगळ्या घडामोडींना वेग आला होता.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यांवर आरोप करत त्याचे पुरावे प्रसार माध्यमांना देण्याची घोषणा सोशल मिडियाद्वारे करत करुना शर्मा आज आपल्या मुलासह परळीत दाखल झाल्या. (Karuna Munde In Parli) पण त्यांनी उचललेले पाऊल आता त्यांच्यासाठीच अडचणीचे ठरत आहे. वैद्यनाथ मंदिराजवळ दर्शन घेऊन पत्रकार परिषद घेण्यासाठी निघालेल्या करुना शर्मा यांची पहिली चकमक उडाली ती तेथे उपस्थित महिलांशी.

शाब्दीक बाचाबाची झाल्यानंतर करुना यांनी थेट एका महिलेवर चाकूने हल्ला करुन तिला जखमी केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Minister Dhnanjay Munde Maharashtra) या महिलेवर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगत पोलिसांनी करुना शर्मा व चालक अरुण मोरे याच्या विरोधात खूनाच प्रयत्न केल्याचे कलम लावून गुन्हा दाखल केला आहे. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप देखील वैद्यनाथ मंदीर परिसरातील महिलांनी करत परळी पोलिसांकडे धाव घेतली.

यातही पोलिसांनी तत्परत्ता दाखवत करुना शर्मा यांच्या विरोधात अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याची प्रक्रिया करण्यासाठी जेव्हा करुना शर्मा यांना पोलीस ठाण्यात नेण्यात येत होते, तेव्हा शकडोच्या जमावाने या गाडीला घेरले होते. ही गाडी पोलीस ठाण्यात पोहचताच पोलीसांनी गाडीची झडती घेतली आणि मागच्या बाजूने एक गावठी पिस्तुल हस्तगत केले. पिस्तुल सापडल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आणि आधीच जमलेला जमाव अधिक संतप्त झाला.

म्हणे मुंडे परिवाराला संपवण्याचा डाव..

धनंजय मुंडे व त्यांच्या परिवाराला संपवण्याचा, घातपाताचा हा प्रकार असल्याचे सागंत करुना शर्मा यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. गाडीतून पोलीस गावठी पिस्तुल हस्तगत करतांनाचे फोटो आणि फुटेज देखील समोर आले. परंतु या प्रकरणाचा कुठलाही उल्लेख किंवा गुन्हा परळी शहर पोलिसांत दाखल नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. 

करुना शर्मा यांच्या गाडीत गावठी पिस्तुल सापडले, ते पोलिसांनी हस्तगत केले तर मग आणखी एक गुन्हा का दाखल केला नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. करुना शर्मा या आपल्या मुलासह आल्या होत्या. मग त्यांनी गाडीत चाकू, गावठी पिस्तुल सोबत आणले होते का? जर आणले असतील तर त्यांचा हेतू काय होता? पोलिसांनी ते हस्तगत केले, मग पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात याचा साधा उल्लेखही का केला नाही? या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल का करण्यात आला नाही? असे अनेक प्रश्न उभे राहतात. 

पोलिसांच्या कारवाई आणि गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेबद्दल देखील यामुळे शंका उपस्थित केली जात आहे. करुना शर्मा, अरुण मोरे सध्या परळी पोलीसांच्या ताब्यात आहेत. उद्या (सोमवारी) त्यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिस तपासात या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणे अपेक्षित आहे. एकंदरित आज परळीत दाखल झालेल्या करुना शर्मा या स्वतःच जाळ्यात अडकल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा ः करुणा मुंडेची आजची रात्र पोलीस कोठडीतच..
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख