सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना आता दीड कोटीपर्यंतची कामे.. - Well-educated unemployed engineers now get job works up to Rs 1.5 crore. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना आता दीड कोटीपर्यंतची कामे..

जगदीश पानसरे
रविवार, 4 जुलै 2021

प्राधिकरणाने २ जुलै रोजी यासंदर्भात परिपत्रक प्रसिध्द केले. सद्यस्थितीत सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंत्यांना १५ लाखापर्यंतची कामे मिळत होती.  

औरंगाबाद ः राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत दीड कोटीपर्यंतची कामे देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. (Well-educated unemployed engineers now get job works up to Rs 1.5 crore.) मराठवाडा पदवीधरचे आमदाल सतीश चव्हाण यांनी यासंदर्भात वेळोवेळी शासनाकडे पाठपूरावा करून निवडणूकीत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या प्रलंबित मागण्या आपण शासनस्तराव प्राधान्यक्रमाने मार्गी लावू, असे आश्वासन चव्हाण यांनी महाराष्ट्र इंजिनअर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांना दिले होते. (Ncp Mla Satish Chavan) त्यानुसार राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या नोंदणीकरणामध्ये वाढ करावी, अशी मागणी केली होती.  

यासंदर्भात १६ जून २०२१ रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संचालक मंडळाच्या बैठकीत सदरील प्रस्ताव मान्यतेस्तव सादर करण्यात आला होता. त्यास संचालक मंडळाने मान्यता दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने २ जुलै रोजी यासंदर्भात परिपत्रक प्रसिध्द केले. सद्यस्थितीत सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंत्यांना १५ लाखापर्यंतची कामे मिळत होती.  

मात्र आता महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या कंत्राटदार नोंदणी नियमावलीत सुधारणा करण्यात  आली आहे.  सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंत्यांना आता दीड कोटीपर्यंतची कामे मिळणार आहेत. हा महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लावल्याबद्दल महाराष्ट्र इंजिनअर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी सतीश चव्हाण यांचे आभार व्यक्त केले आहेत. मागील २० वर्षांपासून सदरील प्रश्न शासनस्तरावर प्रलंबित होता.

राज्य शासनाच्या ग्रामविकास व नगर विकास विभागाअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांसंदर्भात देखील शासनस्तराव पाठपूरावा करण्याचे आश्वासन चव्हाण यांनी महाराष्ट्र इंजिनइर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांना दिले.

हे ही वाचा ः कव्वालीच्या कार्यक्रमात इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख