गोयल यांचे औक्षण करून स्वागत; राज्यापालांच्या दौऱ्याचा आढावा घेत काम सुरू..

सकाळी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या दोर्‍यांच्या तयारीचा आढावा घेतला.
Parbhani Collector Charge News
Parbhani Collector Charge News

परभणी ः अनेक घडामोडी, राजकीय हस्तक्षेपानंतर अखेर जिल्हाधिकारी म्हणून आंचल गोयल रुजू झाल्या. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे परभणीकरांनी जल्लोषात स्वागत केले. महिलांनी ओवाळत त्यांना औक्षणही केले, साडी-चोळी अन् मास्कचा आहेर देखील केला. (Welcome by Goyal; Work begins by reviewing the Governor's visit.) गोयल यांनी या स्वागताचा स्वीकार करत आपल्या कामाला सुरूवात  केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उद्या परभणीत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्यामुळे याचा आढावाही गोयल यांनी घेतला. (Governor Bhgatsingh Kosyari, Maharashtra) ३१ जुलै रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर हे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर राज्य शासनाने आयएएस असलेल्या गोयल यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.

पदभार घेण्यासाठी त्या परभणीत दाखलही झाल्या होत्या. (Anchal Goyal take the Charge As A collector Parbhani) पण यात राजकीय हस्तक्षेप झाला आणि त्यांची बदली रोखण्यात आली होती. मात्र हा प्रकार समजताच परभणीकर व काही सामाजिक संघटना आक्रमक होत रस्त्यावर उतल्या होत्या. राज्यस्तरावर देखील अनेक वेगवान घडामोडी झाल्या आणि अखेर पुन्हा गोयल यांनाच जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्याचा निर्णय झाला.

त्यानंतर गोयल यांनी कागदोपत्री पदभार स्वीकारला. प्रत्यक्षात आज दुपारी कार्यालयात त्यांनी अधिकृत पदभार स्वीकारला.  त्याआधी सकाळी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या दोर्‍यांच्या तयारीचा आढावा घेतला. नियुक्ती दरम्यान घडलेल्या घडामोडीवर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला .

जिल्ह्याचा आढावा घेऊन आपल्याकडून जी चांगली  काम करणे शक्य होईल ती करण्याचा आपला प्रयत्न असेल असे गोयल यांनी स्पष्ट केले.  गोयल याना भेटण्यासाठी परभणीकरांनी मोठी गर्दी केली होती.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com