कोरोनाबद्दल लोकांमध्ये असलेली भिती, गैरसमज दूर करायचे आहेत..

या अंतर्गत परभणी विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद सर्कल निहाय प्रत्येक गावातील नागरिकांच्या आरटीपिसीआर आणि अॅन्टीजन चाचण्या करण्यात येणार आहेत.
Shivsena Mla Rahul Patil Parbhani News
Shivsena Mla Rahul Patil Parbhani News

परभणी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मोठ्या शहरातून कामगार वर्ग आपापल्या गावी परतत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची आरटीपीसीआर व अॅटीजन तपासणी प्रत्येक गावात करण्यासाठी शिवसेनेचे आमदार डॉ. राहूल पाटील यांच्या पुढाकारातुन विशेष अभियान सुरु  करण्यात आले आहे. लोकांच्या मनातील भिती दूर करणे हा या अभियानाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले.

परभणी विधानसभा मतदार संघातील झरी, बोबडे टाकळी,  जोड परळी व पिंगळी, कोथाळा येथे रविवारी (ता.२५) कोरोना विषयक जनजागृती अभियानाला आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आला.  झरी येथे उभारण्यात येणाऱ्या कोरोना केअर सेंटरच्या कामाची पाहणी देखील त्यांनी केली.

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध होत नसल्याने कोरोना रुग्णांना शहरात दाखल करावे लागत आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या कोरोना चाचण्या वाढवण्याच्या दृष्टीने आणि कोरोना विषयीची भीती दूर करण्याच्या दृष्टीने पाटील यांनी जनजागृती अभियान हाती घेतले आहे.

या अंतर्गत परभणी विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद सर्कल निहाय प्रत्येक गावातील नागरिकांच्या आरटीपिसीआर आणि अॅन्टीजन चाचण्या करण्यात येणार आहेत. या कामी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग कर्मचार्‍यांचे सहकार्य घेतले जात आहे.

लोक आजारपण अंगावर काढतात..

ग्रामीण भागात आरोग्याच्या म्हणाव्या तितक्या सुविधा उपलब्ध नसल्याने ताप, सर्दी, खोकला असा आजार ग्रामीण जनता अंगावर काढत आहे. त्यातच कोरोना विषयी अनेक गैरसमज पसरले आहेत. लोकांच्या मनामध्ये बसलेल्या भितीमुळे कोरोना चाचण्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही.

ही भीती व कोरोना विषयक गैरसमज दूर करण्याच्या प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यांना औषधोपचार गावातच मिळवून देण्याच्या दृष्टीने या जनजागृती अभियानास सुरुवात केली आहे. यातून निश्चितच ग्रामीण भागात वाढलेले रुग्ण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास राहुल पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com