जलसंपदा मंत्र्यांनी पक्षाच्या माजी आमदाराची मागणी तात्काळ केली मान्य..

हा प्रश्न मार्गी लागला तर या भागातील गाजगाव, खादगाव, पळसगाव, देरडा, शहापूर, घोडेगाव, कनकुरी, डोमेगाव, बोरगाव, येसगावसह १० ते १२ गावांमधील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
Ncp Ex. Mla Bhausaheb Pati Chikatgaonkar Meet Minister jayant Patil News
Ncp Ex. Mla Bhausaheb Pati Chikatgaonkar Meet Minister jayant Patil News

औरंगाबाद ः वैजापूर मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर हे नुकताच मतदारसंघातील पाणी प्रश्न घेऊन मुंबईत जलसंपदा मंत्र्यांकडे गेले होते. दोन मतदारसंघातील ५३ गावांच्या या पाणी प्रकल्पाचा प्रश्न जयंत पाटील यांनी अवघ्या काही मिनिटात निकाली काढला. दोन महिन्यात हे काम पुर्ण करा, असे आदेशच त्यांनी संबंधित विभागाला दिले. (The Water Resources Minister jayant Patil immediately accepted the demand of the former MLA of the party.) त्यामुळे माजी आमदार चिकटगांवकर आणि त्यांच्यासोबत गेलेल्या तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.

निवडणुकीत पराभव झाला की, अनेक नेते अडगळीत जातात, त्यांचा लोकांशी संपर्क कमी होतो. पण एका पराभवाने न खचता जे जनसंपर्क आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यात सातत्य राखतात तेच पुढे बराच काळ टिकतात.  (Former MLA of Vaijapur Bhausaheb Patil, who won by defeating the Shiv Sena candidate) मोदी लाटेत २०१४ मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून विजयी झालेले वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवर २०१९ मध्ये लढलेच नाही.

पुतण्याने उमेदवारीवर दावा केल्यानंतर यावरून घरात वाद नको म्हणून त्यांनी स्वतःच पक्षाकडे पुतण्याला उमेदवारी देण्याची मागणी केली. पण दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला. शिवसेनेने हा मतदारसंघ पुन्हा खेचून नेला. पण पाच वर्षात केलेली कामे अन् जनसंपर्क कायम ठेवत चिकटगांवकर यांनी माजी आमदार असतांना जमेल तशी मतदारसंघातील कामे सोडवण्याचा प्रयत्न केला.

यागोयोगाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन राष्ट्रवादी सत्तेत आली, त्यामुळे वरिष्ठ नेत्यांशी असलेला संपर्क आणि जिव्हाळ्याचे संबंध त्यांच्या कामी येत आहेत. राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात एक बैठक पार पडली. (Chikatgaonkar had come to Mumbai with the issue of connecting excess water of Narli river to Palasgaon small scale project.)  वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदार संघातील ५३ गावातील पळसगाव लघु प्रकल्प नारळी नदीचे जास्तीचे पाणी पळसगाव लघु प्रकल्पात जोडण्याचा मुद्दा घेऊन चिकटगांवकर मुंबईत आले होते.

दोन महिन्यात प्रकल्प मार्गी लागणार..

हा प्रश्न मार्गी लागला तर या भागातील गाजगाव, खादगाव, पळसगाव, देरडा, शहापूर, घोडेगाव, कनकुरी, डोमेगाव, बोरगाव, येसगावसह १० ते १२ गावांमधील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.  चिकटगांवकर यांनी जयंत पाटलांच्या निदर्शनास ही बाब आणून देत पळसगाव लघु प्रकल्प तत्काळ मार्गी लावण्याची विनंती केली. यावर बैठकीत सबंधित अधिकार्‍यांना पाटील यांनी तात्काळ सूचना दिल्या, व दोन महिन्यांच्या आत हा प्रश्न निकाली काढा, असे निर्देश दिले.

जलसंपदा खात्याचे सचिव मुंडे यांच्यासह संबंधित अधिकारी व औरंगाबाद येथून कुलकर्णी  हे व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चेत सहभागी झाले होते. चिकटगांवकर यांच्या सोबतच्या शिष्टमंडळात प्रशांत शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष, तुळशीराम धुमाळ सरपंच, गणेश अंकुश आदीचा समावेश होता.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com