ब्लॅकमेलिंगसाठीचा खटाटोप म्हणत, विटेकरांनी महिलेचे आरोप फेटाळले

मला माफ करा, शाळेत परत कामावर घ्या, अशी विनंती सदर महिला माझ्याकडे करत होती. परंतु मी नकार दिल्यामुळे तुला बघून घेईन, तुझ्यावर विनयभंग, बलात्काराची केस करेल अशी धमकी सदर महिला देत होती.
Ncp Leader Rajesh Vitekar- Wommans Allegation News Parabhani
Ncp Leader Rajesh Vitekar- Wommans Allegation News ParabhaniSarakrnam

औरंगाबाद: परभणी जिल्ह्यातील एका शिक्षिका असलेल्या महिलेने आपल्या आई, बहिण आणि भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह पुण्यात काल पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी सदर महिलेने राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांच्यावर नोकरीचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, विटेकर यांनी आज या प्रकरणी लेखी खुलासा करत सदर महिला व तिच्या कुटुंबियांनी केलेले सगळे आरोप फेटाळले आहेत.

माझी व माझ्या कुटुंबाची बदनामी करून ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने सदर महिलेकडून वारंवार माझ्यावर खोटे आरोप केले जातात. या संदर्भात आपण परभणी जिल्ह्यातील सोनपेठ व अन्य पोलिस ठाण्यात सदर महिलेच्या विरोधात तक्रार व गुन्हा देखील दाखल केला आहे. या शिवाय न्यायालयात देखील याचिका दाखल केल्याचे विटेकर यांनी आपल्या ६७ पानी खुलाशात म्हटले आहे.

विटेकर यांनी आपल्या सविस्त खुलाशामध्ये सदर महिलेने केलेल्या खोट्या तक्रारी व त्यामुळे तिच्यावर व बहिणीवर दाखल झालेले गुन्हे याचे पुरावेच सादर केले आहेत. गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथील सदर महिला, तिची आई व बहीण यांच्याकडून अनेकांना खोट्या गुन्ह्यात फसवणे, ब्लॅकमेलिंगच्या उद्देशाने त्यांना जाळ्यात ओढणे, बलात्कार व विनयभंगाच्या गुन्ह्यांची भिती दाखवून ब्लॅकमेल करणे अशा तक्रारी व गुन्हे दाखल आहेत.

सदर महिलेचे २०१६ मध्ये लग्न झालेले असून पती सोबत वाद झाल्यामुळे ती स्वतंत्र राहते. सदर लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थी व्यक्तीच्या विरोधात या महिलेच्या आईने सोनपेठ पोलिस ठाण्यात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला होता. पोलिस तपासात तो खोटा असल्याचे समोर आल्यानंतर न्यायालयाने तो रद्द केला होता.

पति व सासऱ्या विरोधातही गुन्हा

पत्नी नादांयला येत नाही म्हणून कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला म्हणून सदर महिलेने स्वतःच्या पति व सासऱ्याच्या विरोधातच एका महिलेला हातीशी धरून बलात्काराचा गुन्हा परळी पोलीस ठाण्यात दाखल केला होता. पुढे पोलिस तपासात हा गुन्हा देखील खोटा असल्याचे समोर आले होते. न्यायालयाने सदर महिलेला पतीकडे नांदायला जाण्याचे आदेश दिलेले असतांना देखील सदर महिला चार वर्षापासून पतीकडे जात नाही, असा दावा या खुलाशात करण्यात आला आहे.

सदर महिलेच्या बहिणी विरोधात देखील लग्नास नकार दिल्यामुळे त्रास दिल्या प्रकरणी कोळसेवाडी, कल्याण जि. ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. असे एक न अनेक प्रकरणे आहेत ज्यात सदर महिला, तिची बहिण व आई खोट्या तक्रारी व बलात्कार, विनयभंगा सारखे गुन्हे दाखल करून ब्लॅकमेलिंग करत असल्याचे समोर आले आहे.

सदर महिलेला छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत कै. रामकृष्ण बापू विद्यालयात विनाअनुदानित सहशिक्षिका पदावर नेमणूक देण्यात आलेली आहे. मात्र कामावर न येणे, विद्यार्थांना न शिकवता बळजबरीने हजेरीपटावर स्वाक्षऱ्या करणे, मुख्याध्यपकांनी मज्जाव केला तर त्यांना शिवीगाळ करणे असे प्रकार सदर महिलेने वारंवार केले.

एवढेच नाही तर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याने शाळेत नेहमी दहशतीचे वातावरण रहायचे. शाळेतील शिपायाला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी देखील सदर महिलेविरुद्ध अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल असून सदर महिलेवर कारवाई करण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.

घरासाठी २५ लाखांची मागणी

मला माफ करा, शाळेत परत कामावर घ्या, अशी विनंती सदर महिला माझ्याकडे करत होती. परंतु मी नकार दिल्यामुळे तुला बघून घेईन, तुझ्यावर विनयभंग, बलात्काराची केस करेल अशी धमकी सदर महिला देत होती. एवढेच नाही तर गंगाखेडला मला घर घेण्यासाठी २५ लाख रूपये द्या, अशी मागणी देखील ही महिला माझ्याकडे करत होती.

पैसे न दिल्यास सोशल मिडियावर बदनामी करेन, विनयभंग, बलात्काराची तक्रार दाखल करील अशी धमकी देखील ही महिला देत होती. त्यामुळे या महिलेच्या विरोधात आपण सोनपेठ पोलिस ठाण्यात खंडणीची तक्रार दिली होती. या प्रकरणी सदर महिलेवर गुन्हा देखील दाखल आहे.

माझ्यासह ४१ प्रतिष्ठीत लोकांविरुद्ध चोरीचा खोटा गुन्हा देखील सदर महिलेने दाखल केला होता, पण पोलिस तपासात तो खोटा असल्याचे समोर आले मागील अनेक वर्षांपासून सदर महिला मला देखील ब्लॅकमेल करत आहे. खोटे आरोप करून गुन्ह्यात अडकवण्याचा व मला बदनाम करण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे. तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर आरोप करण्याआधी सदर महिला व तिच्या कुटुंबाबाबत माहिती किंवा शहानिशा करायला हवी होती.

या प्रकरणात मी न्यायायलायत याचिका दाखल केली असून सर्व प्रकारचे पुरावे व साक्षी दिल्या आहेत यापुढे मला जे काही बोलायचे आहे ते न्यायलयातच बोलेन असेही राजेश विटेकर यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com