करुणा मुंडेच्या गाडीत सापडले गावठी पिस्तुल,,

करुणा यांच्या गाडीची झाडाझडती घेतली. तेव्हा त्यांना गाडीत एक गावठी पिस्तुल आढळून आले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले असून याची चौकशी सुरू आहे.
Karuna Munde News Parali
Karuna Munde News Parali

बीड  ः परळीत पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेल्या करुणा मुंडे यांच्या कारमध्ये गावठी पिस्तुल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. वैद्यनाथ मंदिर परिसरात आलेल्या करूणा मुंडे यांचा दर्शनासाठी आलेल्या महिलांशी वाद झाला. यावेळी काही महिलांनी करूणा मुंडे यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत पोलीसांकडे धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

यावेळी पोलिसांनी करुणा मुंडे यांना पोलिस ठाण्यात नेले, यावेळी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता पोलिंसना कारच्या मागच्या बाजूला गावठी पिस्तुल सापडले. पोलिसांनी ते जप्त केले असून या प्रकरणीही करुणा मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

परळीत पत्रकार परिषद घेण्यासाठी दाखल झालेल्या करुणा मुंडे यांना त्यांच्या मुलासह परळी पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. दोन दिवसांपुर्वी करुणा मुंडे यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत आपण परळीत सासरी येऊन अनेक गोष्टींचा पुराव्यानिशी खुलासा करणार असल्याचे जाहीर केले होते.  दुपारी बारा वाजता त्या पत्रकार परिषद घेणार होत्या.

दुपारी दोन वाजता करूणा मुंडे आपल्या मुलासह परळीत दाखल झाल्या परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत स्थानबद्ध केले आहे. परळी पोलीस ठाण्यासमोर प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने जमा झाल्यामुळे परळीत सध्या तणावाचे वातावरण आहे.

दरम्यान, वैद्यनाथ मंदिर परिसरात करूणा मुंडे यांच्यात आणि तिथे उपस्थित महिलांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर काही महिलांनी करुणा मुंडे यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार केली. यावरून पोलिसांनी करुणा यांच्या विरोधात अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला. पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतांना पोलिसांनी करुणा यांच्या गाडीची झाडाझडती घेतली.

तेव्हा त्यांना गाडीत एक गावठी पिस्तुल आढळून आले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले असून याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, करुणा यांच्या गाडीत गावठी पिस्तुल सापडल्याची माहिती पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या महिला व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना समजल्यावर जमाव संतप्त झाला.

महिलांनी करुणा या मुंडे कुटुंबाचा घातपात करण्यासाठी आल्या होत्या, असा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. करुणा व त्यांचा मुलगा सध्या पोलिसांच्याच ताब्यात असून परळीमध्ये तणावाचे वातावरण आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com