विलासरावांनी शिक्षणमंत्री पद जात असतांना पैठणच्या संतपीठाला मंजुरी दिली..

``पैठणमधील आम्ही संगळ्यांनी त्यांच्याकडे संतपीठाची मागणी करून जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. ज्ञानेश्वरी ग्रंथाला सातशे वर्ष पुर्ण झालेले असतांना आणि त्यानिमित्ताने होत असलेल्या सोहळ्यात विलासरावांनी आम्हाला निराश केले नाही. शिक्षणमंत्रीपद जाणार हे माहीत असतांना देखील त्यांनी संतपीठाला मंजुरी दिली आणि संत ज्ञानेश्वर उद्यानाजवळ १७ एकर जागाही दिली..``अनिल पटेल (कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री) यांनी विलासरावांच्या 75 व्या जयंतीनिमित्तसांगितलेली ही आठवण
vilasrao deshmukh 75 th birtyday news
vilasrao deshmukh 75 th birtyday news

औरंगाबादः विलासराव देशमुख यांची आज ७५ वी जंयती, म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष. महाराष्ट्राच्या विकासात विलासराव देशमुखांचा मुख्यमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री म्हणून केलेल्या कामामुळे मोठा वाटा राहिला आहे. विशेषतः ते मराठवाड्यातील असल्यामुळे आपल्या भागाबद्दल त्यांना जास्त ओढ होती. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला संत तुकोबाराय नाट्यगृह, विविध उड्डाणपुल आणि कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी लढणाऱ्या केवळ मराठवाड्यातीलच नाही तर विदर्भ आणि अन्य राज्‍यातील रुग्ण देखील लाभ घेत असलेले विभागीय कर्करोग शासकीय रुग्णालय व संशोधन केंद्र त्यांनीच औरंगाबादमध्ये उभारले. मराठवाड्याला त्यांनी दिलेली ही मोठी देण होती असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.

दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी आज मनात दाटून येत आहेत. त्यांचा दिलखुलास स्वभाव, हजरजबाबीपणा आणि संकटाला देखील हसत समोर जाणारा असा हा नेता. मला आठवत पैठण या संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत एकनाथ महारांजांच्या भूमीत संत ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या लिखाणाला सातशे वर्ष पुर्ण झाल्‍या निमित्त एक भव्य दिव्य असा सप्तशताब्दी ज्ञानेश्वरी महोत्सव घेण्याची मागणी बाळासाहेब भारदे, शंकरबापू आपेगांवकर यांच्यासह पैठणमधील अनेक संत, राजकीय नेत्यांनी विलासराव देशमुख यांच्याकडे केली. १९९४ च्या मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये विलासराव यांच्यावर शिक्षणमंत्री म्हणून जबाबदारी होती. ज्ञानेश्वरी ग्रंथाला सातशे वर्ष पुर्ण झाल्या निमित्तचा सोहळा आळंदीला व्हावा यासाठी त्या भागातील संत, नेते मंडळी देखील प्रयत्नशील होती.

पण ज्या पैठणमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराजांचे वास्तव्य होते तिथेच हा सोहळा झाला पाहिजे हा आमचा आग्रह विलासरावांनी मान्य केला, आणि १० आॅक्टोबर १९९४ रोजी गोदावरी नदीच्या पात्रात सात दिवस `न  भूतो न भविष्यती` असा सप्तशताब्दी सोहळा पार पाडला. विलासराव देशमुख यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन झाले. देशभरातील किर्तनकार, संत, महंत राजकीय नेते, पुढारी जगविख्यात गायक यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ सोहळ्याला हजेरी लावली, आपली सेवा दिली. पण याच काळात विलासराव देशमुख यांचे मंत्रीपद जाणार अशा हालचाली सुरू झाल्या होत्या. तशी शंका विलासराव देशमुखांनी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त देखील केली होती.

योगायोगाने घडले ही तसेच, संत ज्ञानेश्वरी ग्रंथ सप्तशताब्दी सोहळ्याला उद्घाटक म्हणून हजेरी लावल्यानंतर मुख्यमंत्री शरद पवार समारोपाला आले, तेव्हा विलासरावांकडून शिक्षण खात्याचा पदभार काढून घेण्यात आला होता. त्यांना उद्योग खाते देण्यात आले होते. शिक्षण खाते जाणार याची चाहूल आणि शंका विलासरावांनी या सोहळ्याच्या उद्धाटन प्रसंगीच व्यक्ती केली होती. त्यामुळे पैठणमधील आम्ही संगळ्यांनी त्यांच्याकडे संतपीठाची मागणी करून जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. ज्ञानेश्वरी ग्रंथाला सातशे वर्षे पूर्ण झालेले असतांना आणि त्यानिमित्ताने होत असलेल्या सोहळ्यात विलासरावांनी आम्हाला निराश केले नाही. शिक्षणमंत्रीपद जाणार हे माहीत असतांना देखील त्यांनी संतपीठाला मंजूरी दिली आणि संत ज्ञानेश्वर उद्यानाजवळ १७ एकर जागाही दिली.

समारोपाच्या वेळी जेव्हा मुख्यमंत्री शरद पवार पैठणमध्ये आले, तेव्‍हा आपल्या भाषणात विलासरावांनी आपण मंजुरी दिलेले संतपीठ झाले पाहिजे असे सांगितले. आमचे  उद्योग पाहून तुम्ही माझ्याकडचे शिक्षण खाते काढून उद्योग खाते दिले. पण शिक्षणमंत्रीपद जात असतांना मी पैठणच्या संतपीठाला मंजुरी देऊन १७ एकर जागा दिली आहे. आता हे संतपीठ झाले पाहिजे असा आग्रह त्यांनी मुख्यमंत्र्याकंडे धरला होता. 

(शब्दांकनः जगदीश पानसरे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com